मराठी सृष्टीतील अनेक कलाकार ह्या वर्षी विवाहबद्ध झाले आहेत . नुकतेच गुरुवारी २७ मे २०२१ रोजी अभिनेत्री “मानसी नाईक” ही देखील विवाहबद्ध झाली आहे. मानसी नाईक हिचे हे दुसरे लग्न आहे. कांदिवली स्थित धृवेश कापुरीया सोबत तिने आपला नवा संसार थाटला आहे. काही दिवसांपूर्वी मानसी नाईक हिने आपल्या इंस्टाग्रामवरून मेहेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते त्यावरून ती पुन्हा लग्नबांधनात अडकरणार असल्याचे स्पष्ट झाले होते मात्र ती कोणासोबत लग्न करते हे मात्र तिने गुलदस्त्यात ठेवले होते. धृवेश कापुरीया हा कंपनीत कार्यरत आहे. याशिवाय मालाड येथील द सोसायटी गुरू या संस्थेचा (सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस) तो फाउंडर आहे.

मानसी नाईक हिने अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी मालिका अभिनेता “अक्षर कोठारी ” ह्याच्यासोबत तिचे पहिले लग्न झाले होते मात्र काही वर्षांपूर्वीच या दोघांनी कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अक्षर कोठारी हा छोट्या पडद्यावरील हँडसम अभिनेता म्हणून परिचयाचा आहे. सध्या तो स्टार प्रवाह वरील ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ ही मालिका साकारत आहे. बंध रेशमाचे या मालिकेतून त्याचे छोट्या पडद्यावर आगमन झाले होते. त्यानंतर त्याने छोटी मालकीण, आराधना, कमला या मालिका अभिनित केल्या. चाहूल २ या मालिकेतून तो पत्नी मानसीसोबत झळकला होता. या मालिकेतून मानसीने अक्षरच्या पत्नीचीच भूमिका साकारली होती. रिअल लाईफ मधली ही जोडी त्यावेळी ऑन स्क्रीनही प्रेक्षकांना खूप आवडली होती. मानसीने अनेक टीव्ही मालिका अभिनित केल्या आहेत. ललित २०५, स्वराज्यजननी जिजामाता, गणपती बाप्पा मोरया, तू माझा सांगाती या आणि अशा विविध मालिकेतून मानसी नाईक हिने आजवर महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या दुसऱ्या लग्नाची माहिती जाहीर केली असून तिच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी यानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्न सोहळ्याचे फोटो सध्या तिने पोस्ट केले नसले तरी लग्न करून सासरी जातानाचा गाडीतला एक व्हिडिओ तिने शेअर करून हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेत्री मानसी नाईक हिला नुकत्याच झालेल्या या वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन .