झी मराठी एका पाठोपाठ एक अशा तब्बल ५ नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. ऑगस्ट महिन्यात येत्या १६ तारखेपासून झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका निरोप घेणार आहे. मालिकेचे शेवटच्या एपिसोडचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सेटवर नुकताच मालिकेच्या सर्वच कलाकारांनी एकत्र येऊन शेवटच्या क्षणाची आठवण म्हणून केक कापला होता. आता हे सर्व कलाकार आपआपल्या घरी रवाना झाली आहेत. मात्र देवमाणूस मालिकेचा शेवट कसा असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

आता लवकरच झी मराठी वाहिनी “ती परत आलीये”, “माझी तुझी रेशीमगाठ”, “मन झालं बाजींद”, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या ४ मालिका प्रेक्षकांसमोर आणणार आहे. यात आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो वाहिनीने रिलीज केला. त्यामुळे झी मराठीवर तब्बल ५ नव्या मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत. वाहिनीने प्रथमच असा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय प्रेक्षकांचे कितपत मनोरंजन करेल हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. वाहिनीने ५ व्या नव्या मालिकेचा ‘लवकरच …’ असे कॅप्शन देऊन प्रोमो जाहीर केला. या प्रोमोत तुम्हाला ज्या अभिनेत्रीचा चेहरा दिसतो ती अभिनेत्री आहे “ऋता दुर्गुळे”. ही मालिका आहे की कुठला रिऍलिटी शो हे अजून वाहिनीने स्पष्ट केले नसले तरी झी वाहिनीची ही ५ वी नवी मालिका म्हणून ऋता दुर्गुळेचे अभिनंदन केले जात आहे. ऋता दुर्गुळे हिने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. झी युवा वरील फुलपाखरू या मालिकेने ऋताला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली होती. या मालिकेतून तिने वैदेहीची भूमिका गाजवली होती. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात उमेश कामत सोबत तिला काम करण्याची संधी मिळाली. ऋताला आता झी वाहिनीवर झळकण्याची नामी संधी मिळत आहे. मालिकेचे नाव जाहीर झाले नसले तरी ही एक नामी संधी तिच्या करिअरसाठी अधोरेखित करणारी ठरणार आहे. या नव्या मालिकेबाबत अधिक उलगडा लवकरच होईल तुर्तास ऋता दुर्गुळेला या निमित्त खूप खूप शुभेच्छा…