आज रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० महिलांचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १८८ धावांचं लक्ष भारतापुढे ठेवलं. भारताने फलांजी करत हा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत नेला. भारताच्या स्म्रिती मंधाना हिने ४९ बॉलमध्ये ७९ रन केले त्यात ९ चौकार आणि ४ षटकार तर शेफाली वर्मा हिने २३ चेंडूत ३४ धाव ठोकल्या. भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना देविका वैद्य हिने चौकार मारून १८७ धावांची बरोबरी केली आणि हा सामना सुपर ओव्हर पर्यंत नेला. भारताने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करत ६ चेंडूत २० धाव केल्या. ऑस्ट्रेलियापुढे जिंकण्यासाठी आता ६ चेंडूत २१ धावांच लक्ष ठेवलं.

ऑस्ट्रेलिया हे लक्ष पार करू शकले नाही त्यांनी सुपर ओव्हरमध्ये फक्त १५ धावा काढल्या. भारताने हा सामना ५ रानांनी जिंकला. आजचा रंगलेला हा सामना भारतात खेळला गेला . भारतातील डी. वाय. स्पोर्ट अकादमी मुंबई येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता हा सामना रंगला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा टी -२० सामना होता. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी भारताचा दारुण पराभव केला होता. पहिल्या सामन्यात भारताने ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियन महिलांनी अवघ्या १८ व्या ओव्हरमध्येच फक्त १ गाडी बाद १७३ धावा करत हा सामना सहजा सहजी जिकल होता. आजच्या सामन्यांमुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत १-१ अशी बरोबरी करू शकला. भारतीय आणि ऑस्ट्रेलिया महिलांमध्ये आणखीन ३ सामने खेळले जाणार आहेत. ते १४ डिसेंबर, १७ डिसेंबर, आणि २० डिसेंबर असे मुंबई याच ठिकाणी आणि सर्व सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता खेळले जाणार आहेत. आजच्या झालेल्या सामन्यात भारताचा विजय झाला असून पुढे होणाऱ्या ३ सामन्यांसाठी भारतीय महिलांना खूप खूप शुभेच्छा…