Home Entertainment “मन उडू उडू झालं” मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोबत झळकणार हा अभिनेता

“मन उडू उडू झालं” मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे सोबत झळकणार हा अभिनेता

8276
0
man udu udu zal hruta
man udu udu zal hruta

झी मराठी वाहिनीवर लवकरच आणखी एक नवी मालिका दाखल होणार आहे. “मन उडू उडू झालं” असं या नव्या मालिकेचं नाव आहे. येत्या ३० ऑगस्ट पासुन ही नवी मालिका रात्री ७.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पाहिले न मी तुला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे स्पष्ट झाले आहे. मन उडू उडू झालं या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. मालिकेच्या प्रोमोमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या नव्या मालिकेत अभिनेत्री “ऋता दुर्गुळे” मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

hruta durgule and ajinkya
hruta durgule and ajinkya

‘दुर्वा’ या मालिकेतून ऋता दुर्गुळे हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेतून तिने वैदेहीची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ऋताला प्रसिद्धी मिळाली होती. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातही ती झळकली. ऋता आता प्रथमच झी वाहिनीची मालिका साकारत आहे . ऋता सोबत झळकणाऱ्या या अभिनेत्याला देखील अनेकांनी ओळखलं असावं. ह्या अभिनेत्याचे नाव आहे “अजिंक्य राऊत”. महेश कोठारे यांच्या “विठुमाऊली” मालिकेतून विठ्ठलाच्या भूमिकेत अजिंक्य राऊत झळकला होता. या मालिकेसोबत टकाटक २ हा चित्रपट त्याने अभिनित केला आहे. अजिंक्य राऊत हा मूळचा परभणीचा. परभणीवरून आलेला हा मुलगा मॉडेलिंग क्षेत्रात आपले नशीब आजमावत होता. मॉडेलिंग करताकरता त्याला विठुमाऊली मालिकेत झळकण्याची संधी मिळाली होती. परभणीवरून आल्याने प्रथम त्याने आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवले. लूकमध्ये चेंज केला. मधल्या काळात त्याने नृत्याचे धडे गिरवले आणि अगोदरपेक्षा अधिक हँडसम दिसण्यावर लक्ष केंद्रित केले.

actor ajinkya raut
actor ajinkya raut

झी मराठीवर येऊ घातलेल्या ” मन उडू उडू झालं” या नव्या मालिकेत अजिंक्य राऊत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अजिंक्य राऊत आणि ऋता दुर्गुळे यांची केमिस्ट्री चांगली जुळणार हे मालिकेच्या प्रोमोमधूनच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकणार हे अगोदरच निश्चित झाले आहे. एक नवे कथानक घेऊन येणारे नव्या दमाचे हे कलाकार प्रेक्षकांची निराशा करणार नाहीत अशी आशा आहे. अनेकांना प्रश पडला होता कि ह्या मालिकेत ऋता सोबत कोण अभिनेता असणार आता ह्या प्रश्नच निराकरण झालय असं म्हणायला हरकत नाही. विठूमाऊलीमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारा अजिंक्य राऊत
आता झी वाहिनीवरील ह्या नव्या मालिकेतही आपल्या अभिनयाची छाप नक्कीच पडेल ह्यात शंका नाही. ” मन उडू उडू झालं” या मालिकेनिमित्त ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here