काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने तिच्या सोशिअल मीडियावर “मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करुइच्छीत आहे. तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा ” असे म्हणून ति पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत होती. पण ह्या महामारीच्या काळात अभिनय क्षेत्राला चांगलाच फटका बसला आहे. सुरु असलेल्या मालिकांचं शुटिंग देखील महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करावं लागतंय. त्यामुळे अनेक कलाकारांचं हातच काम देखील गेलं. पण आता अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने नुकतीच एका नवीन व्यवसायाची सुरवात केली आहे.

अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने तिच्या सोशिअल मीडियावर तिच्या नव्या व्यवसायाबद्दल माहिती दिली आहे. तिने नुकतंच “मुद्रपाकखान” नावाने खाद्य व्यवसाय सुरु केला आहे. पुण्यातील कोथरूड भागात तिचा हा व्यवसाय सुरु झाल्याचं समजते. मराठी पंजाबी अश्या विविध प्रकारचे जेवण तसेच पार्टी साठीच्या ऑर्डर्स घेत असल्याची माहिती तिने दिली आहे. पार्टी ऑर्डर्स सोबतच ३१ जुलै २०२१ च्या शनिवार पासून दार शनिवार आणि रविवार साठी एक फिक्स मेनू देखील ती शेअर करणार आहे. हा मेनू प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी शेअर केला जाईल आणि पूर्व बुकिंग ऑर्डर प्रमाणेच त्या घेतल्या जातील. शिवाय कोथरूड आणि आसपासच्या परिसरात ५ माणसांपेक्षा जास्त लोकांची ऑर्डर असल्यास फ्री होम डिलिव्हरी देखील करणार असल्याचं तिने सांगितलं. हॉटेल सारखी चटकदार चव पण घरच्यासारखं स्वछ, सुरक्षित आणि तितकंच मायेन बनवलेले पाच ते पन्नास लोकांसाठीच बनवलेले खाद्यपदार्थ ऑर्डर्स प्रमाणे घेणार असल्याचं तिने नमूद केलं आहे. ह्या व्यवसायात तिला तिचा पती राजेंद्र करमरकर हा देखील साथ देताना पाहायला मिळतोय. काम कोणतंही असो ते मन लावून केलं तर त्याच नक्कीच यश मिळत. अभिनया व्यतिरिक्त तिने सुरु केलेलं हे काम खूपच प्रेरणादायी आहे. अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिला नव्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा …