मराठी सृष्टीत सध्या अनेक जणांची लगीनघाई तर कोणी साखरपुडा केलेला पाहायला मिळत आहे. नुकताच मराठमोळा गायक राहुल वैद्य हा देखील विवाहबद्ध झाला तर सुयश टिळकच्या साखरपुड्यानेही प्रेक्षकांचे मन वेधले. सांग तू आहेस का या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री देखील नुकतीच विवाहबद्ध झालेली पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री आहे “भाग्यश्री दळवी”. भाग्यश्री दळवीचा नुकताच साखरपुडा झाला असून साखरपुड्याच्या एक व्हिडिओ तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. तिच्या या साखरपुड्याला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ने हजेरी लावली होती. भाग्यश्री दळवी नेमकी आहे तरी कोण याबाबत अधिक जाणून घेऊयात…

अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिने ‘सांग तू आहेस का’ या मालिकेतून सिद्धार्थ चांदेकरची बहीण म्हणजेच दीप्तीची भूमिका साकारली आहे. या मालिकेअगोदर हर्षद अतकारी आणि गौतमी देशपांडे हिची मालिका ‘सारे तुझ्याचसाठी ‘ या मालिकेतूनही भाग्यश्री दलविने महत्वाची भूमिका साकारली होती. कॉलेजमध्ये असताना भाग्यश्रीने अनेक नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग दर्शवला होता. इथूनच तिच्या अभिनयाला खरा वाव मिळत गेला. कॅफेमराठीच्या ” मी, माझी गर्लफ्रेंड आणि…” या वेबसिरीजमधून भाग्यश्री झळकली होती. या वेबसिरीजमध्ये एक गोड कपल दर्शवण्यात आले होते जे प्रेक्षकांचे हलकेफुलके मनोरंजन करण्यात यशस्वी झाले होते. काही भागांच्या या सिरीजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. या वेबसिरीजमुळे भाग्यश्रीला चांगली ओळख मिळाली होती. यातूनच पुढे तिला मालिकांमध्ये झळकण्याची नामी संधी मिळाली. अभिनेत्री भाग्यश्री दळवी हीला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा…