माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेचे असंख्य चाहते आता नाराज झालेले पाहायला मिळत आहेत कारण सोशल मिडीयावर सध्या या मालिकेतील कलाकार म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे ही मालिका सोडत असल्याची बातमी व्हायरल होत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेत संकर्षण कऱ्हाडेने समीर ची भूमिका साकारली आहे. यश आणि समीरची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली आहे. आजोबा, समीर आणि जय यांच्यातील मजामस्ती प्रेक्षकांना खूपच आवडू लागली आहे.

या तिघांचा एकत्रित असलेल्या सिनची प्रेक्षक नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. एक जिवलग मित्र काय असतात हे समीर आणि यशने मालिकेतून दाखवुन दिले आहे. त्यामुळे आता समीरचे नसणे मालिका प्रेक्षकांना मुळीच रुचनार नाही. तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आता सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे लवकरच ‘तू ‘ म्हणशील तसं या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी सरकारच्या निर्बंधांमुळे सर्व नाटकांचे प्रयोग बंद पडले होते मात्र त्यावरील निर्बंध हटवल्याने एका नव्या उमेदीने हे कलाकार रंगभूमीवर येण्यास पुन्हा एकदा सज्ज झाली आहेत. संकर्षण कऱ्हाडे देखील ह्याच कलाकारांमधला एक कलाकार आहे जो स्वतः लिहिलेल्या नाटकात अभिनय देखील साकारत आहे याची उत्सुकता जरी असली तरी माझी तुझी रेशीमगाठ ही मालीका देखील त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. या मालिकेतील समीरच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे त्यामुळे संकर्षण ही मालिका सोडणार नाही हे निश्चित आहे.

केवळ नाटकांच्या दौऱ्यामधून जसा वेळ मिळेल तसा तो मालिकेच्या चित्रीकरणासाठी उपस्थित राहणार आहे केवळ या मालिकेतून त्याने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे हे नक्की, कारण मालिकेत समीरने बंगलोरच्या नव्या प्रोजेक्टबद्दल यशला सांगितले होते हा प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी समीरला बंगलोरला पाठवले जाईल येत्याच काही दिवसात हे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळतील आणि त्यात समीरची कमी प्रेक्षकांना निश्चितच जाणवू लागेल . मात्र असे असले तरी संकर्षण नाटकाच्या दौऱ्यातून अधून मधून वेळ मिळेल तसा मालिकेत दिसणार आहे त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांची निराशा होणार नाही याची खात्री मालिकेच्या टीमकडून देण्यात येत आहे. समीरची भूमिका संकर्षणने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सुरेख निभावली आहे त्यामुळे दुसऱ्या कोणाला ही भूमिका देणे प्रेक्षकांनाही रुचणार नाही… तूर्तास तू म्हणशील तसं या नाटकाच्या पुनरागमनासाठी संकर्षण कऱ्हाडेचे अभिनंदन आणि शुभेच्छा…