Home Entertainment कॉलेजच्या दिवसात करीना कपूर आणि अवधूत गुप्ते होते एकाच वर्गात… जाणून घ्या...

कॉलेजच्या दिवसात करीना कपूर आणि अवधूत गुप्ते होते एकाच वर्गात… जाणून घ्या अवधूत गुप्तेच्या आयुष्यातील भन्नाट किस्सा

1948
0
avdhoot gupte and kapeena kapoor news
avdhoot gupte and kapeena kapoor news

बॉलीवूडची बेबो ‘करीना कपूर’ ही तिच्या अभिनयामुळे चांगलीच चर्चेत असते. स्वतःच्या मादक सौंदर्याने ती तरुणांची मने जिंकत असते. अशातच प्रत्येक तरुणाला वाटतं असत की, आपण एकदातरी करीना कपूरला भेटाव. तिच्या बाजूला बसावं आणि तिला बघत राहावं. पण ही सुवरणसांधी तुम्हाला एक्झामहॉलमध्ये मिळाली तर? ही घटना सत्यात उतरली आहे ती म्हणजे आपल्या लाडक्या अवधूत गुप्तेच्या आयुष्यात. अवधुतने खुद्द खुलसा केला आहे की, करीनाला पाहत बसलो आणि मी नापास झालो. जाणून घेऊया अवधूतच्या आयुष्यामधील हा किस्सा. ‘मराठी तडका’ या वाहिनीला मुलाखत देताना अवधूतने त्याच्या तरुण वयातील करीना कपूर बरोबरचा किस्सा सांगितला. अवधूतच्या वर्गात करीना परीक्षा द्यायला बसायची एवढाच त्या दोघांमधला संबंध होता. आता करीना कपूर वर्गात आहे म्हटल्यावर पेपरमध्ये लक्ष कसं लागणारं.

avdhoot gupte photo
avdhoot gupte photo

किस्सा सांगताना अवधूत म्हणाला की,”त्या सगळ्या पेपरला मी नापास व्हायचो. आता काय होणार दुसरं आपण इथे पेपर लिहितोय आणि ती इथे समोर बसली आहे”. “त्यावेळी करीना कपूर भरपूर जाड होती. तिला बसायला अख्खा एक बेंच लागायचा. दुसऱ्या कोणाला जागाच व्हायची नाही. पण तिच्या चेहऱ्यावर एक ग्लो होता आणि घारे डोळे. मोठ्या लांबलचक गाडीतून ती उतरायची. ती आल्यावर आजूबाजूची पब्लिक गोळा व्हायची”. असं सांगत अवधूतने त्याच्या आयुष्यातील करीनासोबतचा किस्सा शेअर केला. अवधूतने आतापर्यंत मराठी तसेच बॉलीवूड सिनेसृष्टीतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सोबतच अवधूतने अनेक चित्रपटांची निर्मिती देखिल केली आहे. सध्या अवधूत हा आपल्याला त्याचा ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रम होस्ट करत असल्याचं पाहायला मिळतोय. त्याच्या या कार्यक्रमात आत्तापर्यंत अनेक मराठी कलाकार तसेच राजकारण्यांनी हजेरी लावलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here