मराठी मालिका सृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच राणादा आणि पाठक बाई लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची बातमी गेल्या काही महिन्यांपासून व्हायरल होत होती. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे गेल्या काही दिवसांपासून नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या घरी जाऊन केळवण देखील साजरे करताना दिसले होते. मात्र हे दोघे लग्न कधी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागून राहिलेले पहायला मिळाले. अक्षयाने इंस्टाग्रामवरून आपल्या लग्नाच्या पत्रिकेचा एक फोटो शेअर केला होता. मात्र लग्नाची तारीख जाहीर करण्याचे तिने यावेळी टाळलेले पाहायला मिळाले. त्यावरून २५ नोव्हेंबर रोजी हे दोघेही विवाहबद्ध होणार अशी चर्चा रंगली. त्या ‘दिवशी तुम्ही तयार आहात का मला नवरीच्या गेटअपमध्ये बघायला’. असे कॅप्शन देऊन तिने निळ्या रंगाच्या साडीत नटलेला एक व्हिडिओ शेअर केला होता.

शुक्रवार २५ नोव्हेंबर २०२२ रोजी हार्दिक आणि अक्षया दोघेही विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली होती. मीडियाने देखील ही बातमी कव्हर केली होती. मात्र काही कारणास्तव हे लग्न आता पुढे ढकलले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ह्यांचे लग्न कधी होणार हंस प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर उपस्थित राहिला आहे. ही तारीख आता जाहीर करण्यात आली असून येत्या २ डिसेंबर रोजी हे दोघेही विवाहबद्ध होणार असल्याचे खात्रीशीर सांगण्यात येत आहे. पुण्यातील कर्वेरोडवरील पंडित फार्म्स येथे त्यांचं शाही थाटात लग्न पार पडणार आहे. आपल्या लग्नासाठी त्यांनी हे फार्म हाऊस का निवडलं याचं कारण हार्दिकने चला हवा येऊ द्या च्या मंचावर सांगितलं होतं. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सेलिब्रिटी जोडप्याचं याच ठिकाणी लग्न पार पडलं होतं. त्यावेळी हे फार्म हाऊस अक्षया आणि हार्दीकला देखील खूप आवडलं होतं आणि म्हणूनच या ठिकाणाला भेट देऊन त्यांनी इथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या लग्नाचा सोहळा कायम आठवणीत रहावा त्याला मायेची ऊब लागावी म्हणून त्यांनी अक्षयाच्या लग्नातल्या साड्यांचे काही धागे मित्रमंडळी , नातेवाईक यांच्या मदतीने विणले होते.

या सोहळ्याचा क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. अमोल नाईक, वीणा जगताप, जवळच्या खास मैत्रिणी, नातेवाईक यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. हार्दिकने देखील अक्षयाच्या साडीचे काही धागे हातमागावर विणलेले पाहायला मिळाले होते. दोन दिवसांपासून त्यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. काल हार्दीकने घरचं केळवण असे कॅप्शन देऊन सजलेल्या ताटाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे आता लग्नाची गडबड अंतिम टप्प्यावर आली असल्याचे संकेत त्याने यातून दिलेले पाहायला मिळाले. येत्या शुक्रवारी २ डिसेंबर २०२२ रोजी ह्यांचं लग्न होणार आहे त्यामुळे ह्या दोघांच्या लग्नाची घटिका आता समीप येऊन ठेपली असल्याचे दिसून येते. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील हि फेव्हरेट जोडी आता खरोखरच विवाह बंधनात आहे.