ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं काल २६ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झालं. गेल्या १६ दिवसांपासून ते किडनी आणि हृदयासंबंधीत आजाराशी ते झुंज देत होते. विक्रम गोखले या संकटातून सुखरूप बाहेर पडावेत अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांनी केली होती. अनेकांनी त्यांना बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना केली होती. मात्र त्यांची ही प्रार्थना आता अयशस्वी ठरलेली पाहायला मिळाली. त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली अशा भावना मोठमोठ्या कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. विक्रम गोखले यांच्या पश्चात वृषाली गोखले दोन मुली निशा आणि निधी, जावई असा परिवार आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीवर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. सिनेसृष्टीतला एक मोठा तारा हरपला असल्याचं दुःख अनेकांनी व्यक्त केलं.

विक्रम गोखले एक अष्टपैलू कलाकार म्हणून सर्वपरिचित होते. वजीर, नटसम्राट, कळत नकळत या भूमिका गाजल्या. विलासराव देशमुख आणि विक्रम गोखले हे कॉलेजपासूनचे मित्र होते. गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना दोघांत मैत्री झाली होती. या दोघांनाही अभिनय आणि राजकारणाची आवड होती. विलासराव देशमुख पुढे राजकारणात गेले तर विक्रम गोखले यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याचा मार्ग निवडला. गरवारे कॉलेजमध्ये असताना विलासराव देशमुख यांच्याकडे गाडी होती. ह्या गादीवर बाजून त्यांनी अनेक ठिकाणी फिरले असल्याचं त्यांनी सांगितलं होत. अनेकदा हे दोघेही गाडीवर बसून फेरफटका मारायला जायचे. फेरफटका मारता मारता याच गाडीवर बसून असेच एकदा हे दोघे चक्क मैत्रिणीच्या घरीही पोहोचले होते. हा किस्सा आज खितच व्हायरल होताना पाहायला मिळतोय. शाळेच्या आणि कॉलेजच्या जीवनातील किस्से सहसा कोणी विसरत नाही हा किस्सा त्यांच्या आयुष्यातील खूप मोठा आणि आठवणीतला किस्सा असल्याचं त्यानी सांगितलं होत.