Home Entertainment बिग बॉस मराठी मधील झालेल्या खेळात भाऊ आदर्श शिंदे म्हणाले हा कसला...

बिग बॉस मराठी मधील झालेल्या खेळात भाऊ आदर्श शिंदे म्हणाले हा कसला खेळ? असला भंगार खेळ खेळला

32699
0
adarsh shinde on big boss marathi
adarsh shinde on big boss marathi

बिग बॉस मराठी ३ सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात पाहायला मिळालाय. खरतर एकमेकांना डावलून पुढे जायच्या आणि टिकून राहायच्या खेळात स्पर्धकांना आपण काय करतो ह्याच भान राहत नाही. कोणी आपल्या जुन्या आठवणी तर कोणी आपल्यावर झालेले अत्याचार ह्याची कहाणी सांगून प्रेक्षकांची सहानुभूती मिळताना पाहायला मिळतात. नुकताच प्रकाशित झालेल्या एका व्हिडिओवर गायक आदर्श शिंदे ह्यांनी आपलं मत मांडलं आहे त्यात त्यांनी आपल्या भावाबद्दल होत चाललेलं राजकारण आणि स्पर्धा याबद्दल बराच काही म्हटलं आहे.

utkarsh shinde in big boss marathi
utkarsh shinde in big boss marathi

बिग बॉस मराठी ३ च्या खेळाबद्दल बोलताना गायक आदर्श शिंदे म्हणतो “हा कसला खेळ? काही Strategy आहे की नाही? मान्य आहे त्यांनी विकासला बाहेरच नाही येऊ दिलं पण ती strategy होती त्याच्यावर नक्किच शनिवारी निकाल लागला असता की ती strategy योग्य होती की नव्हती ..एवढ होऊनही Utkarsh Anand Shinde मधे sportsmanship असल्यामुळे तो शांत आहे आणि पुढे चाल्लाय. विकास ने मागून गळा धरुन आणि विशाल ने आंगला धरुन खाली पाडणे योग्य आहे? त्याच्या डोक्याला मुक्का मार ही बसला. Garden area असल्यामुळे त्या माराचा impact कमी झाला. पण तरीही तो बरा आहे असं आम्हाला कळविण्यात आले. BB ची team नेहमी स्पर्धकांच्या safety साठी सज्ज असते याची खात्री ही पटली. एवढं होऊन ही माझा भाऊ संयम पाळून आहे. आणि शांतपणे खेळतोय. हा video viral होतोय आणि तसाच viral होत माझ्यापर्यंत पोहोचला आणि अनेक वेळा मित्रांनी share केला.. भाऊ म्हणून वाईट वाटलं की असा खेळ होऊ नये.

shindeshahi utkarsh and adarsh shinde
shindeshahi utkarsh and adarsh shinde

ही कुस्ती नव्हे. सगळ्यांना तो tough स्पर्धक वाटतोय म्हणुन असा भंगार खेळ खेळला जाऊ नये. काही लोक याचं चुकिचं राजकारण fake accounts द्वारे social media वर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे याचं राजकारण करु नका एवढीच विनंती. उत्कर्ष बरा आहे. बघुया शनिवारी आणि रवीवारी काय होतय.” गायक आदर्श शिंदे ह्यांनी शेअर केलेला व्हिडिओ आणि आपलं मत ह्यावर बिगबॉसच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याच्यावर नाराजी देखील दर्शवली आहे. तुमचा भाऊ स्पर्धेत आहे म्हणून तुम्ही त्याला सपोर्ट करताय पण तुम्ही सर्वांची बाजू मांडली पाहिजे आणि जे योग्य आहे त्यावर बोललं पाहिजे असं म्हटलं आहे. तर अनेकांनी उत्कर्षला सपोर्ट दर्शवत तोच बिग बॉस जिंकेल असं भाकीत देखील केलं आहे. विशेष म्हणजे बिगबॉस स्पर्धकांची काळजी घेतो आणि चुकीचं वागणाऱ्याला खडेबोल देखील सुनावतो हे कित्तेकदा पाहायला मिळालं आहे त्यामुळेच हा शो पाहणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here