शाहरुखच्या मुलाला वाचवण्यासाठी नवाब मालिकांची खेळी आता अधिकाऱ्यांनाच केलं जातंय टार्गेट. राजकीय लोक आता ह्या प्रकरणात शिरकाव करताना पाहायला मिळतायेत. सरकारी अधीकारी समीर वानखेडे आता आर्यनची केस हाताळत आहेत त्यामुळे आता सरळ त्यांनाच टार्गेट करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आता समीर वानखेडे आणि त्यांच्या घरातील सदस्यांवरच टीका करायला सुरवात केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी चक्क सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर विधान केले आहे ते म्हणतात..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक म्हणतात “समीर वानखेडेचा बाप बोगस आहे, त्याच्या घरातील सगळेच बोगस आहेत वर्षभरात त्याची नोकरी जाईल आणि तो तुरुंगात जाईल” असा निशाणा त्यांनी साधला आहे. आर्यनच्या केस मध्ये समीर वानखेडे महत्वाची भूमिका निभावत आहेत त्यामुळे त्यांना बाजूला करण्यासाठी हे सगळं बोललं जातंय असं अनेकांचं मत आहे. राजकारण कुठे कधी आणि कसंही करता येत हेच ह्यातून सिद्ध होत इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे आणि त्याची बहीण मालदीव आणि दुबईमध्ये बॉलीवूड कलाकारांकडून हफ्ता वसूल करतात असा दावाही त्याच्यावर ठोकण्यात आला होता. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ह्या समीर वानखेडे ह्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे मनसेने समीर वानखेडेंना पाठिंबा दर्शवत तुम्ही तुमचं काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं देखील म्हटलं आहे. नुकतंच समीर वानखेडे यांनी देखील ह्यावर आपलं मत मांडलं आहे ते म्हणतात.. “नवाब मलिक हे खोटारडे आहेत मला बाजूला करण्यासाठी हे सर्वकाही केलं जातंय आणि मी त्याच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई करणार” असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

शाहरुख खान हे बॉलीवूड मधलं खूप मोठं नाव आहे त्यामुळेच अनेक बॉलीवूड कलाकार त्याच्या पाठीशी आहेत त्यामुळेच ह्या केसला आणखीन उशीर होताना पाहायला मिळतो. बॉलीवूड कलाकार सोशिअल मीडियावर आर्यन खानची बाजू मांडताना पाहायला मिळतात त्याला सपोर्ट करत त्याला उगीचच अडकवलं जातंय असा दावा देखील करताना पाहायला मिळतात. पण मराठी फिल्म्स इंडस्ट्रीतील अनेक कलाकारणांनी सत्याच्या बाजूने जाणयासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच एका पोस्टमध्ये क्रांती रेडकर हिने पतीबद्दल आदर व्यक्त करत ते एक चांगले आणि चिकाटीचे अधिकारी असल्याचं सांगितलं आहे. एनसीबी ने देखील नुकताच एक प्रेस नोट रिलीज केली आहे त्यात समीर वानखेडे यांनी कधीही दुबईला जाण्यासाठी अर्ज केला नाही आणि त्यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवून त्यांना उगीचच बदनाम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे.