गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक तिच्या खासगी आयुष्यात आलेल्या वादळामुळं चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षा पूर्वी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिनं लग्न केलं होतं. पण दोन वर्षातच त्यांच्या नात्यात दुरावा आलाय. दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर प्रदीप आणि मी लग्न केलं मात्र लग्नानंतर प्रदीप च वागणं बदललं अखेर हे सहन न झाल्याने मी त्याच्यापासून वेगळं होत होण्याचा निर्णय घेतल्याचा मानसी नाईक ने जाहीरपणे तिच्या सोशल मीडिया पेजवर स्पष्ट केला आहे मात्र आता मानसी आणि प्रदीप यांच्या घटस्फोटावर प्रदीपनेही मौन तोडला असून मानसीने केलेल्या आरोपांवर प्रदीप अखेर स्पष्ट बोलला आहे . मी खर आहे .कुणी कितीही म्हटलं तरी साखर आणि मीठ यातला फरक सुज्ञ लोकांना कळतोच अशी कॅप्शन देत प्रदीपने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय . मानसी सांगत असलेली प्रत्येक गोष्ट खरी मानू नका असं सांगायलाही तो विसरलेला नाही.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये मानसीनं घटस्फोट घेण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे. या मुलाखतीत मानसीनं पहिल्यांदा घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं. ‘माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही, काही लपवणार पण नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला असून यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे’, असं तिनं म्हटलं होतं.घटस्फोटांच्या चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण मला विचारत आहेत, की, लग्नकरण्यापूर्वी तुला माहीत नव्हतं का तो कसा आहे? तुला कळलं नाही का तेव्हा. त्यांना मी हेच सांगेन की, लग्नापूर्वी आम्ही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होतो. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आम्ही एकत्रच होतो. तेव्हा सगळेच एकमेकांशी चांगले वागत होते, असं मानसी म्हणाली. यापूर्वी मानसीने प्रदीप वर केलेल्या आरोपांमध्ये असं म्हटलं होतं की प्रदीप ने केवळ माझ्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी करिता लग्न केलं आहे जोपर्यंत माझ्याकडून त्याला पैसा मिळत होता तोपर्यंत तो चांगला वागत होता . माझ्या प्रसिद्धीचाही त्याने स्वतःसाठी वापर करून घेतला . मात्र आता त्याचं वागणं पूर्णपणे बदललं असून त्याच्यासोबत राहणं शक्य नाही . मानसीने केलेल्या या आरोपाचं खंडन करत प्रदीपनेही त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे .प्रदीपनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओला त्यानं कॅप्शन दिलं आहे की, ‘मी खरा आहे त्यामुळं शत्रूंची भीती वाटतं नाही’, असं त्यानं म्हटलं आहे. तर आणखी एका फोटोवर त्यानं म्हटलं आहे की, दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊ नका, कारण कधी कधी मीठ देखील साखरेसारखं दिसतं’, असं प्रदीपनं म्हटलं आहे.

त्यामुळे आता मानसीने प्रदीपवर केलेले आरोप खरे आहेत की प्रदीप ने मानसी बाबत केलेलं त्याचं मत खरं आहे हे सध्या तरी समजू शकत नाही . परंतु यानिमित्ताने दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहून लग्न केलेली मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांची जोडी मात्र एकमेकांपासून विभक्त होण्याच्या मार्गावर आहे . मानसीची खूप चांगली मैत्रीण दिपाली सय्यद हिने प्रदीप खरेराची पूर्णपणे चौकशी केली होती असंही मानसीने तिच्या लग्नाच्या वेळी सांगितलं होतं . यावरूनही मानसीचे काही चाहते तिला असा प्रश्न विचारत आहेत की दिपाली सय्यद ने जर प्रदीप खरेराची चौकशी केली होती आणि त्यात काहीही गैर माहिती मिळाली नव्हती तर मग आता प्रदीप वर मानसीने केलेले आरोप खरे आहेत का ? मात्र याबद्दल सध्या तरी मानसिक काहीच बोलत नाहीये . मानसीच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना आता प्रदीप खरेराने मानसी विषयी व्यक्त केलेल्या परखड मताने नवी चर्चा निर्माण केली आहे .