Home Entertainment अक्षया आणि हार्दिक यांचं शाही पेशवाई लुक आला समोर फोटो होताहेत व्हायरल

अक्षया आणि हार्दिक यांचं शाही पेशवाई लुक आला समोर फोटो होताहेत व्हायरल

3309
0
akshaya and hardik wedding photo
akshaya and hardik wedding photo

तुझ्यात जीव रंगला’ मधील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नेटकऱ्यांना तर कधी एकदा त्यांना नवरा आणि नवरीच्या वेशात पाहतोय असं झालंय. आता त्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. आज हार्दिक आणि अक्षया यांच्या डोईवर अक्षता पडणार आहेत. त्यांच्या लग्नातील फर्स्ट लूक आता समोर आला आहे. यात अक्षया आणि हार्दिक दोघेही अगदी राजेशाही थाटात सजलेले दिसत आहेत. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नविधींना अखेर सुरुवात झाली आहे. हार्दिक आणि अक्षया यांच्या हळदी आणि मेहंदीच्या फोटोंनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला होता.

hardik akshaya halad
hardik akshaya halad

त्यांच्या हळदीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल झाले. अखेर आता लवकरच ते दोघे सप्तपदी चालणार आहेत. त्यापूर्वीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. त्यांचा पहिला लूकही आता समोर आला आहे. यात अक्षयाने राणी कलरची नऊवारी परिधान केली आहे. या नऊवारीवर चंद्राकोर आहे. तिने गळ्यात अनेक राजेशाही थाट असलेले दागिने परिधान केले आहेत. मोठाली ठुशी, चंद्रहार, नाकात नथ यात अक्षया खूप सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोतही दिसत आहे. तर हार्दिकने सोनेरी रंगाचा अंगरखा परिधान केला आहे. त्यावर अक्षयाच्या साडीसोबत जुळणारी शाल घेतली आहे. गळ्यात भलीमोठी रुद्राक्षांची माळ घातली आहे. दोघांच्याही डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. अक्षयाने नेसलेली डार्कराणीकलरची नऊवारी पैठणी खास कारागीरांकडून बनवून घेतली आहे. जेव्हा ही साडी विणली जात होती तेव्हा त्यामध्ये काही धागे हार्दिकनेही विणले आहेत. हार्दिक आणि अक्षया यांचा लग्नातील लुक कसा असेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. संगीत सोहळ्याला अक्षया वनपीस ड्रेसमध्ये तर हार्दिक सूटमध्ये दिसला होता. तर इतर विधींसाठी दोघांनीही पारंपरिक ड्रेस परिधान केले होते.

akshaya and hardik wedding
akshaya and hardik wedding

लग्नासाठी मात्र ही जोडी शाही पेशवाई थाटात बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे.अगदी पेशवाई थाटात ते दोघेही यज्ञासमोर बसले आहेत. त्यांचे हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लवकरच त्यांची सप्तपदी आणि वरमालाही पार पडणार आहे. अक्षया आणि हार्दिकने जून २०२२ मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता अक्षया आणि हार्दिक लग्नबंधनात अडकणार आहेत. ह्याच जोडही सोबत आज अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले हे देखील विवाह बंधनात अडकणार आहेत. मराठी सृष्टीत कलाकारांच्या आयुष्यात प्रथमच २ मराठी अभिनेते आणि अभिनेत्री एकाच दिवशी विवाह करताना पाहायला मिळणार आहेत. अभिनेता हार्दिक जोशी -अक्षया देवधर आणि आशय कुलकर्णी- सानिया गोडबोले ह्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here