माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत आत रंजक वळण आले आहे. काका परीला बाहेर फिरायला घेऊन जातात तेंव्हा तेथे परांजपे वकील काही लोकांना घेऊन येतो आणि काकांना नेहापासून दूर करतो.शिवाय काकांना त्यांच्या घरी नेऊन परी हरवली म्हणून नेहाला फोने करून सांगतो इतकंच नाही तर नेहा रडत रडत घरी येते तेंव्हा मी परीला घरी आणल्याशिवाय इथे येणार नाही काही करून मी परीला आणणारच असं वाचन देखील देतो. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परांजपे वकील काटकारस्थानी दाखवला आहे. परांजपे वकिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव “चैतन्य चंद्रात्रे”असं आहे. आज त्यांच्या विषयी माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

‘आभास हा’ या गाजलेल्या मालिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि अभिनेता चैतन्य चंद्रात्रे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.इतकंच नाही तर ‘एका पेक्षा एक’, ‘व्याप कुणाचा ताप कुणाला’, ‘कुलवधू’, ‘लेक लाडकी या घरची, रुंजी’,‘एक तारा’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’, ‘फ्रेंड्स’, ‘गुलमोहर’ अशा चित्रपट आणि मालिकेतून’त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत त्याने विरोधी भूमिका देखील उत्कृष्ठरित्या निभावलेली पाहायला मिळते. पण बराच काळ तो पडद्यावर पाहायला मिळाला नाही त्याच हि एक कारण आहे. या मधल्या काळात त्याने कौस्तुभ आठवले, कुमार गौरव आणि अभिषेक कुमार या मित्रांच्या मदतीने त्याने ‘ए बी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. हे नक्की आहे तरी काय असा सवाल तुमच्या मनात नक्कीच आला असेल. या स्टुडिओमधून ‘सुलतान’, ‘बाहुबली 2’, ‘वेलकम टू कराची’, ‘धूम 3’ या भारतीय चित्रपट तसेच ‘कुंगफू योगा’, ‘रेसिडेंट एव्हील’, ‘फास्ट अँड फ्युरिअस’ अशा परदेशी चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्टसचं काम त्यांनी केलं. नेटफ्लिक्स सारख्या नामांकित जाहिरातींच काम देखील या स्टुडिओमार्फत करण्यात आलं आहे. व्हिज्युअल इफेक्टस साठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. केवळ एका सेकंदाच्या कुठल्याही सीनमध्ये २४ ते २५ फ्रेम्स असतात. एखादा सिन यातून बदलायचा असेल तर त्याचे बारकावे लक्षात घेऊन, म्हणजे चित्रीकरणात कुठला भाग असावा कुठला नसावा, दिवसातला कोणता वेळ आहे त्यानुसार माणसांची, घराची, झाडांची सावली बदलणं ह्या सर्व गोष्टींचा विचार करून तसे बदल सीनमध्ये घडवून आणावे लागतात.

जवळपास ५० ते ६० मराठी मुलं त्यांच्या ए बी स्टुडिओत काम करत आहेत. व्हिज्युअल इफेक्टस खूपच मेहनतीचं आणि तितकंच किचकट काम असलं तरी या कामाचा उत्तम मोबदला त्यांना मिळतो. सध्या अनेक देश विदेशातील चित्रपटासाठी हे काम त्यांना मिळत असलं तरी येत्या काळात मोशन पिक्चर्स असोसिएशन फिल्म्स ऑफ अमेरिका ह्याचं सर्टिफिकेट त्यांना मिळवायचं आहे जेणेकरून अशा होतकरू मुलांना एकत्रित आणून ए बी स्टुडिओ भारतातील नंबर एकच व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अभिनय करून आपला व्यवसाय सांभाळणाऱ्या ह्या मेहनती कलाकाराला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसाठी आणि तो करत असलेल्या व्यवसायात भरभराटी यावी यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून अभिनेते चैतन्य चंद्रात्रे याना खूप खूप शुभेच्छा..