सध्या हिंदी बिगबॉस मध्ये मराठी अभिनेत्याची हवा आहे. अनेकांनी हे गृहीत धरलं आहे कि शिव ठाकरे हा बिगबॉस १६ चा विजेता आहे. नुकतीच अभिनेत्री कियारा अडवाणी बिगबॉस मध्ये आली असता तिने शिवला तुला कशी मुलगी आवडते असा प्रश्न केला होता. त्यावर शिव गालातल्या गालात हसून मॅडम मला कबीर मध्ये तुमच्या सारखी लॉंग हेअर वाली मुलगी खूप आवडते. ह्यावर कियाराने त्याला डान्स करायला देखील सांगितला. शिव ठाकरे याने त्यावेळी सर्व स्पर्धकांसोबत डान्स देखील केला. मराठी बिगबॉस चाहतेच नाही तर अनेक हिंदी प्रेक्षक देखील आता शिवला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. ह्यात एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती अभिनेत्री आहे “स्मिता गोंदकर”.

अभिनेत्री स्मिता गोंदकर ही एक स्टंट रायडर म्हणूनही ओळखली जाते. झी मराठीवरील ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेतून सध्या ती संजनाचे पात्र साकारत होत. याअगोदर अनेक हिंदी म्युजिक व्हिडीओ त्याचप्रमाणे काही मोजक्या मराठी चित्रपटातून तिने अभिनय साकारला आहे. मराठी बिगबॉसच्या पहिल्या सिजनमध्ये तिने उत्तम खेळ खेळता होता. एक स्ट्रॉंग कन्टेस्टंट म्हणून तिने आपला दबदबा बनवला होता. नुकताच अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने शिव ठाकरे सोबतच एक फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहली आहे. त्यात स्मिता म्हणते कि ” शिव तुमचा खूप अभिमान आहे. शिव ठाकरे हे सोपे नाही पण तुम्ही खेळ चांगल्या प्रकारे हाताळत आहात. तुम्ही बिग बॉस सीझन 16 ट्रॉफीसाठी पात्र आहात म्हणून मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. ट्रॉफी घरी मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक शक्ती मिळो.” अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या ह्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे. अनेक मराठी बिगबॉस स्पर्धक हिंदी बिगबॉस विजेते पदासाठी शिव ठाकरेला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. शिव एक उत्तम खेळाडू तर आहेच त्याच बरोबर तो माणूस म्हणूनही तितकाच चांगला आहे. त्यामुळेच शिवला आज इतकी प्रसिद्धी मिळत आहे.
