स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागेवर जुई गडकरींची प्रमुख भूमिका असलेली “ठरलं तर मग” हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील कलाकार मालिकेला निरोप देताना भावुक झालेले पाहायला मिळाले. मालिकेत कीर्ती ,शुभम ची केमेस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. चाहत्यांनी हि मालिका चालू ठेवा अशी मागणी केली होती पण सतत तेच तेच ट्विट्स पाहणं आणि त्याच कथानकामुळे कुठेतरी प्रेक्षकही कंटाळलेले पाहायला मिळाले. कथानक जरा भरकटत जाण्यापेक्षा या मालिकेने आपला गाशा गुंडाळलेला पाहायला मिळाला . गेल्या आठवड्यात मालिकेचे कायमचे पॅकअप करण्यात आले. प्रत्येक कलाकाराला वाटते आपल्याला ओळख मिळणं अशी एक तरी भूमिका आपल्या आयुष्यात यावी.

अशीच भूमिका मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री सम्रुद्धी केळकर हिला फुलाला सुगंध मातीचा या मालिकेने वेगळीच ओळख बनवून दिली याच मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. ज्या दिवशी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जात होता त्यावेळी कीर्तीला निरोप देताना अभिनेत्री समृद्धी भावुक झालेली पाहायला मिळाली तिने यावेळी एक पोस्ट लिहली होती अभिनेत्री समृद्धी केळकर म्हणते कि, “कीर्ती कला अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक मुलीचा ड्रीम रोल असावा असं विविधांगी पात्र.. विविधांगी या साठी म्हटलं कारण या पात्राला अनेक छटा पैलू आहेत सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणारी ,समंजस घरातल्या आणि बाहेरच्यांना समजून सांभाळून घेणारी नाती जपणारी स्वप्नपूर्तीचा ध्यास असणारी मात्र कोणताही अन्याय सहन न करणारी स्वतःच स्पष्ट मत वेळोवेळी मांडणारी, स्वतःवर पूर्ण विश्वास असणारी अशी हि कीर्ती साकारताना नकळत खऱ्या आयुष्यात पण खूप काही शिकायला मिळालं. अगदी बंदूक चालवायला शिकेपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकायला करायला मिळाल्या वैयक्तिक आयुष्यात देखील तिने अजाणतेपणी बरंच शिकवलं. मी सम्रुद्धी म्हणून माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील आत्मसात करण्याचा पर्यन्त करत आहे. कीर्ती मी तुला कधीच विसरू शकणार नाही तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ होती आणि कायम राहशील” असं म्हणत अभिनेत्री समृद्धी केळकरने कीर्तीला निरोप दिला.

आता वेगळ्याच कारणाने कीर्ती साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर पुन्हा चर्चेत आलेली पाहायला मिळते. अभिनेत्री समृद्धी केळकर हिच्या घरी लग्नाची तयारी सुरु झालेली पाहायला मिळते. तुम्हाला वाटत असेल आता मालिका संपली म्हटल्यावर समृद्धीच्या लग्नाचीतयारी सुरु झाली असलं पण तस नाहीये. अभिनेत्री समृद्धी केळकर हिच्या घरी लगीनघाई सुरु आहे ते तिच्यासाठी नव्हे तर तिची बहीण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. आपल्या बाहिणीच्या लग्नाची जोरदार तयारी करताना समृद्धी सध्या पाहायला मिळतेय. एका पोस्टमध्ये तिने लवकरच कलवरी म्हणून मिळणार असल्याचं देखील म्हटलं आहे. “ताईच लग्न” म्हणत तिने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या बहिणीच्या लग्नासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला पाहायला मिळतो. याचसोबत आता तू कधी लग्न करणार आहेस असा सवाल देखील चाहते विचारताना पाहायला मिळत आहेत.