हिंदी बिग बॉसच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पहिली विजेती ठरलेली दिव्या अग्रवाल आता लवकरच मराठमोळ्या कुटुंबाची सून होणार आहे. काल ५ डिसेंबर रोजी दिव्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मराठमोळ्या अपूर्व पाडगावकर याने तिला खास अंगठी देऊन प्रपोज केलेले होते. दिव्याच्या बर्थ डे पार्टीत ‘बायco’ नावाची अंगठी देऊन अपूर्व दिव्याला प्रपोज करत तिला ‘माझी बायको होणार का?’ म्हणून विचारताना दिसला. त्यावर दिव्याने लाजत त्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. बिग बॉसच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची पहिली विजेती दिव्या आता मराठी कुटुंबाची सून होणार असल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिव्या ही मॉडेल , कोरिओग्राफर, ऍक्टरेस म्हणून ओळखली जाते. तिने पत्रकारितेची पदवी मिळवली आहे. दिव्याने काही सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता.

२०१५ साली ‘मिस नवी मुंबई’ बनन्यचा मान तिने पटकावला होता. याशिवाय मिस इंडियन प्रिन्सेस आणि ‘ मिस टुरिझम इंटरनॅशनल इंडिया’ अशा सौंदर्य स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. स्प्लिट्सव्हीला या शोमध्ये तिने सहभाग दर्शवला होता. रागिणी एमएमएस रिटर्न्स २ या हॉरर वेबसिरीजच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. व्हिडीओ जॉकी वरून सूद सोबत ती अनेक वर्षे रिलेशनशिप मध्ये होती मात्र साधारण नऊ महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले असल्याचे तिने जाहीर केले होते. हिंदी बिग बॉसच्या ओटीटीमुळे दिव्या प्रसिद्धीच्या झोतात आली. शमिता शेट्टी आणि निशांत भट यांना हरवून तिने विजेते पद पटकावले होते. दिव्या ही कोरिओग्राफर असून अनेक जाहिरातींसाठी तिने कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे तर काही जाहिरातींमध्ये तिला झळकण्याची देखील संधी मिळाली आहे. वरून सूद सोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिव्या अपूर्व पाडगावकरच्या प्रेमात पडली. अपूर्व पाडगावकर हा मुंबईतच लहानाचा मोठा झाला. तो बीजनेसमन असून मुंबईत त्याचे स्वतःचे रेस्टॉरंट आहेत. चेमुर येथील ‘Pot Pourri’ या प्रसिद्ध रेस्टॉरंटचा तो मालक आहे. ५००० स्केअर फूट च्या भव्य दालनात त्याचे हे हॉटेल खवय्यांचे आकर्षण बनले आहे.

कोरोनाच्या काळात अपूर्वने समाजसेवेचा मार्ग स्वीकारत हजारो लोकांना मोफत धान्यसाठा पुरवला होता. एवढेच नाही तर कोरोनाचे संकट संपल्यावरही त्याने हजारो लोकांसाठी अन्नदान देखील केले होते. त्यामुळे अपूर्व पाडगावकर हे नाव सर्वदूर पसरले होते. त्यावेळी त्याच्या कार्याची फखल विविध माध्यमांनी घेतली होती. अपूर्व इंजिरीअर आहे तसेच त्याने एमबीएचे शिक्षण देखील घेतले आहे. चेंबूर येथील ट्रेसफॉर्म जिमचा तो ब्रँड आंब्यासिडर देखील ठरला होता. फिटनेस मार्गदर्शक म्हणूनही त्याने काम केले होते.२००९ साली वाशी येथे त्याने आपले पहिले रेस्टोरंट सुरू केले होते त्यानंतर त्याचा हॉटेल क्षेत्राचा व्यवसाय भरभराटीला येत गेला. हॉटेल व्यवसायात त्याने स्वतःचा ब्रँड तयार केला. दिव्याच्या प्रेमात पडलेल्या अपूर्वने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाचा प्रस्ताव तिच्याकडे मांडला आहे. आणि आता हे दोघेही लवकरच लग्न करतील अशी अशा दिव्या आणि अपूर्वच्या चाहत्यांना आहे.