“पाहिले न मी तुला” हि मालिका काही महिन्यांपूर्वीच बंद झाली असली तरी मालिकेतील अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पाहिले न मी तुला मालिकेतील हिरोची आई म्हणजेच उषामावशी साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे ह्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि त्यात त्या गंभीर जखमी देखील झाल्या. सद्य त्यांची प्रकृती ठीक असली तरी त्या अंथरुणाला खिळून असल्याचं बोललं जातंय. आता ह्याच मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींबाबाद वाईट बातमी स्वतः तिनेच शेअर केली आहे.

पाहिले न मी तुला या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री तन्वी मुंडळे हिचे वडील प्रकाश मुंडळे यांचे निधन झाले आहे. हि बातमी शेअर करत तिने आपल्या वडिलांना श्रद्धांजली देखील वाहिनी आहे. सोशिअल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना अभिनेत्री तन्वी मुंडळे म्हणते “तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु… see you whenever my time comes…” तिने शेअर केलेली हि बातमी पाहताच अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेक कलाकारांना हे माहित देखील पडलं नव्हतं. मालिकेत सोबत असलेली अभिनेत्री वर्षा दांदळे हिने देखील तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत म्हणाल्या “अरे बापरे. आता वाचलं.. काय झालं?.. तनु सांभाळ बाळा.. बाबाना भावपूर्ण श्रद्धांजली.” नक्की काय झालं होत हे मात्र समजू शकले नाही.पण तन्वी मुंडळे हिचे तिच्या बाबांशी असणारे नाते किती मैत्रीपूर्ण होते हे तिच्या पोस्टवरूनच समजते. प्रकाश मुंडळे यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.