Home News अभिनेता प्रथमेश परबने शेअर केलेल्या दादा कोंडके ह्यांच्या घराबद्दची पुन्हा होतीय चर्चा

अभिनेता प्रथमेश परबने शेअर केलेल्या दादा कोंडके ह्यांच्या घराबद्दची पुन्हा होतीय चर्चा

2551
0
prathamesh parab on dada kondke home
prathamesh parab on dada kondke home

दादा कोंडके मराठी चित्रपट सृष्टीतील एक अग्रेसर अभिनेते आणि दिग्दर्शक तसेच प्रोड्युसर होते. दादांनी मराठी सृष्टीला एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉपर्टीवरून आणि वारसहक्कावरून अनेक वाद झाले ते आजतागायत चालूच आहेत. दादा कोंडके हे पुण्यातील भोर तालुक्यातील इंगवली गाव चे. नुकतच अभिनेता प्रथमेश परबने दादा कोंडके ह्यांच्या घराबद्दल एक पोस्ट आपल्या फोटोसह पोस्ट केली आहे. त्या फोटोत दादाकोंडके ह्याच्या जुन्या घराबाबत प्रथमेशने व्यथा मांडत दादांना वंदन केले आहे. तो म्हणतो….

prathamesh parab dada kondke old home

प्रथमेश म्हणतो “विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके superstar, दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो zoom करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते! आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुल च्या boards ने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का?????प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित….!! ” ह्या प्रथमेश च्या पोस्ट नंतर दादांच्या चाहत्यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. अनेकांनी वस्तुस्तिथी मांडत आपले मत व्यक्त केले आहे.

dada kondke home

फोटो शेअर करत ते म्हणतात “प्रथमेश परब तु एक चांगला नवोदित अभिनेता जरी असलास तरी सामाजिक ज्ञान आणि भान तुला वयानुसार तसे कमीच आहे. कोणत्याही प्रकारची माहिती न घेता दादा कोंडके यांच्या जुन्या रहात्या घराचा फोटो सोशलमिडियावरुन शेअर करुन तु फिल्म इंडस्ट्रीतील जणु काही कोणी महान जागृत व्यक्तीमत्व असल्याचे दाखवतोस.. तु जो जुन्या घराचा फोटो शेअर केला आहे ते त्यांचे कोंडके कुटुंबातील अगदी जुने सामायिक घर असुन त्यांचे कुटुंबांचा विस्तार झाल्याने त्यांच्या भाऊकीतील प्रत्येकाने या घराचे शेजारीच गरजेनुसार घरे बांधलीत.खरंतर तुला भावकी आणि गावकी समजणार नाही. अभिनेते दादा कोंडके यांचे एकत्रित कुटुंब असुन लहानपणापासून कोंडके कुटुंब म्हणजेच दादा व त्यांचे बंधु ज्या घरात वास्तव्यास राहिले किंवा त्यांनी जे घर आयुष्यभर आपले माणले ते जुने घर आजही सुस्थितीत आहे. या दादांचे जुन्या घराचे त्यांच्या कुटुंबियांनी अगदी व्यवस्थित जतन करून ठेवलेले आहे.चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार त्या घरी आजही जात येत असतात. हे घर अजुनही आहे तसेच जुने असुन अलिकडच्या काळात केवळ कौले बदलून त्या घराची चांगली रंगरंगोटी देखील केलेली आहे. आजही या घरात कोणी रहात नसले तरी त्यांचे परिवाराकडून त्याची निगा राखली जाते.. उगाचच प्रसिद्धीसाठी काही तरी खोटे वृत्त पसरवून लोकांच्या दिशाभूल करू नकोस…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here