अग्गबाई सासूबाई मालिकेनंतर अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिकेतुन काढता पाया घेतला तिच्याजागी आता उमा ह्रिषीकेश हि अभिनेत्री पाहायला मिळतेय. तेजश्रीने साकारलेल्या भूमिका मग ती शुभ्रा असो किंवा होणार सून मी ह्या घरची मधील जानवी असो तिने केलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतली. नुकतीच तिने साकारलेली सूर नवा ध्यास नवा मधील अँकरिंग देखील प्रेक्षकांना खूप आवडली. फक्त मालिकाच नाही तर झेंडा, शर्यत, लग्न पाहावे करून, ती सध्या काय करते अश्या अनेक चित्रपटात तिचा अभिनय भाव खाऊन जातो.

पण तेजश्री प्रधानच्या आयुष्यात खूप चढ उत्तर आले. सेलिब्रिटींच्या आयुष्याबाबत प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते त्यांच्या खऱ्या आयुष्यातील घटनांवर लोक नेहमी चर्चा करतात. तेजश्री प्रधानचे आयुष्य देखील शशांक सोबतच्या घटस्फोटानंतर चांगलेच रंगवलेले पाहायला मिळाले. चाहत्यांनी तिच्या घटस्फोटाबाबत तर अनेक प्रश्न उपस्थित केले एवढेच नाही तर तिच्या नातेवाईकांनी देखील तिच्या आईकडे याबाबत बोलून दाखवले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने ह्याबाबत काय म्हटलं ते पहा.. ती म्हणते ‘आम्ही सेलिब्रिटी आहोत त्यामुळे आमचं खाजगी आयुष्य कोणापासून लपलेलं नाहीये माझंही आयुष्य कोणापासून लपलेलं नाही…जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये एक कठीण काळ आला तेव्हा कित्येक नातेवाईकांनी माझ्या आईला असं सांगितलं की काय गं तू तर एवढं देवाचं करतेस मग तुझ्या मुलीच्या आयुष्यात असं का व्हावं?…पण त्यावेळी माझ्या आईचं एक ठाम मत होतं ते मला आयुष्यभर पुरणार आहे…त्यावेळी ती खूप संयमाने म्हणाली होती की तिच्या आयुष्यात जे होतंय जे झालंय ते तिचं नशीब आहे ते बदलता नाही येणार आणि माझा देव काय जमिनीवर येऊन तिचं दैव नाही बदलू शकत…परंतु तिच्या वाट्याला जे लिहिलं गेलंय त्या सर्वांना तोंड द्यायची ताकद तिला मिळो हे मी देवाकडे मागणे करते…’ तेजश्री आणि शशांक दोघेही अभिनेते आणि एकाच मालिकेत काम करत असताना आधी प्रेम आणि नंतर लग्न झाले पण ते फार काळ टिकलं नाही.