Home Entertainment काळ्या रंगावरून तुला कसं वाटतं… भाऊ कदमच्या लेकीचं चोख उत्तर

काळ्या रंगावरून तुला कसं वाटतं… भाऊ कदमच्या लेकीचं चोख उत्तर

511
0
bhau kadam daughter with family
bhau kadam daughter with family

चला हवा येऊ द्या शोमधून भाऊ कदम यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आपल्या वडिलांची ओळख न सांगता त्यांची मुलगी मृण्मयी सुद्धा स्वतःची वेगळी ओळख जपताना दिसत आहे. मृण्मयी ही व्यावसायिक आहे तिचा हेअरबो बनवण्याचा व्यवसाय आहे. युट्युबवर मृण्मयीचे अनेक व्हिडीओज आहे ज्यातून ती मेकअप कसा करायचा याचेही मार्गदर्शन करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगली प्रसिद्धी देखील मिळवत आहे. मृण्मयी रंगाने सावळी आहे. आपल्याला या रंगावरून अनेकदा विचारले जाते. नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या सावळ्या रंगावरून प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मृण्मयी म्हणाली होती की माझे काका, वडील, भावंड सगळेच सावळे आहेत माझी आई फक्त गोरी आहे पण त्यावरून कोणीच कधी काही विचारत नाहीत. मुलाखतीतील हा प्रश्न मृण्मयीला आता विचार करायला भाग पाडत आहे.

bhau kadam daughter photo
bhau kadam daughter photo

सावळ्यारंगामुळे आपल्याला का वेगळं ओळखलं जावं असा प्रश्न ती विचारू लागली आहे. यावर सोप्प उत्तर तिने शोधून काढलेलं पाहायला मिळतं. ती म्हणते की, “मला आजकाल खूप ठिकाणी विचारण्यात येतं की तू एवढी सावळी आहेस आणि तरीही तू युट्युबवर मोटिव्हेशनवर व्हिडीओ बनवत असतेस आणि आम्हाला ते बघायला खूप छान वाटतं. आजकाल डस्की स्किनला घेऊन अनेकजण प्रश्न विचारतात यामुळे खूप लोकं लो फिल करत आहेत त्यांच्या स्किनला घेऊन ते अजिबात कॉन्फिडन्ट नाहीयेत. मला हा प्रश्न पडतो की गोऱ्या माणसांना हा कधी प्रश्न विचारतो का? की तुमचा स्किन कलर असा का आहे? आणि तुम्ही एवढे सुंदर कसे काय दिसता तर असं अजिबात नाही. मला असं वाटतं की कुठलाही स्किन कलर कॅटेगरीज केला नाही पाहिजे. इथूनच आपण फुल स्टॉप घेऊया की कुठल्याही कलरला कॅटेगरीज नाही करणार. मला असं पर्सनली वाटतं की सगळे कलर खूपच सुंदर आहेत बस त्याला बघणाऱ्याचं मन ना चांगलं पाहिजे.आपण आजपासून एक नियम काढुयात की मला आणि कोणालाच कधीही त्यांच्या स्किन कलर बद्दल एकही प्रश्न विचारायचा नाही. कारण आपल्या कलरची आपली एक ओळख आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here