अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ह्यांना एका एनजीओला आर्थिक मदत करत असताना वाईट अनुभव आला आहे. दरम्यान त्यांनी ही माहिती ट्विट करून आपल्या चाहत्यांना कळवली आहे. आणि आपली मदत त्याच व्यक्तीला किंवा संस्थेला पोहोचते की नाही याची खात्री करून घ्या असे आवाहन केले आहे. मी याबाबत फसली गेली असून यातून मी आता चांगलाच धडा घेतला आहे. घाईघाईत आपली ही मदत दुसऱ्याच कोणाला पोहोचू नये या हेतूने त्यांनी इतरांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

सुप्रिया पिळगावकर म्हणतात की, एका एनजीओला मी आर्थिक मदत केली होती. काही रक्कम मी त्या एनजीओच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली होती. त्यानंतर सक्सेसफुल असा मेसेज आल्यानंतर काही वेळाने मला त्या एनजीओकडून रक्कम मिळाली असल्याचा मेसेज आला होता. माझ्या बँकेच्या खात्यातूनही ती रक्कम डेबिट झाली असल्याचा मला मेसेज आला. परंतु याबाबत चौकशी करावी म्हणून त्यांनी त्या एनजीओला फोनवरून संपर्क केला. त्यात अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात ती रक्कम आली नसल्याचा खुलासा झाला. मी देऊ केलेली मदत दुसऱ्याच कोणाच्या खात्यात गेली असावी असे सुप्रिया पिळगावकर यांचे म्हणणे आहे. घाईघाईने किंवा नजरचुकीने आपल्याकडून ही मदत देत असताना काही माहिती चुकीची लिहू शकतो ज्यांच्या नावे आपण मदत पाठवतो त्यांचे नाव पुन्हा एकदा तपासले जावे जेणेकरून माझ्या बाबत जे घडलं ते इतरांच्या बाबत होऊ नये. याच हेतूने सुप्रिया पिळगावकर यांनी ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे. सुप्रिया पिळगावकर गेल्या काही वर्षांपासून हिंदी मालिका सृष्टीत सक्रिय आहेत म्हणून त्या मराठी चित्रपट किंवा मालिकेत फारशा पाहायला मिळत नाहीत. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी जसे मराठी मालिकेत पादर्पण केले त्याचप्रमाणे सुप्रिया पिळगावकर मराठी मालिका सृष्टीत याव्यात अशी त्यांच्या चाहत्यांची ईच्छा आहे.