Home Entertainment माझा होशील ना मालिकेत होणार आता आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री

माझा होशील ना मालिकेत होणार आता आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री

3078
0
actress komal dhande new role
actress komal dhande new role

माझा होशील ना मालिकेत आता माँटीच्या आईची एन्ट्री होताना पाहायला मिळणार आहे. आदित्य ग्रुप ऑफ कंपनी आपल्या नावावर करून घेण्यासाठी आता माँटीने आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यातच आता त्याच्या आईची एन्ट्री होणार असल्याने मालिका नव वळण घेणार हे नक्की. माँटी हा जेडीचा मुलगा आहे पण त्याची आई कोण हा अनेकांना पडलेला गूढ प्रश्न होता त्याचा उलगडा पुढच्याच भागात पाहायला मिळणार आहे. मॉंटीची आई दाखवल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे “कोमल धांडे-पाठारे”. तिने याआधी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोहितच्या आईची भूमिका देखील साकारली होती.

actress komal dhande pathare
actress komal dhande pathare

अनेकांना हे माहित नसेल कि अभिनेत्री “कोमल धांडे-पाठारे” ह्यांनी संगीत विषयातून एमएची पदवी प्राप्त झाल्यानंतर मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीतातून डिप्लोमा केला. आता संगीतातून त्यांना पीएचडी देखील करायची अशी त्यांची ईच्छा आहे. कोमल धांडे यांनी आजवर अनेक मंचावरून अप्रतिम गाण्यांचे सादरीकरण केले आहे. ‘ये लावणीचे बोल कौतुके’, ‘जिजाऊ जन्मोत्सव’ अशा कार्यक्रमात त्यांनी गाणी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. नृत्य गुरू विमला नायर यांनी त्यांचे कलागुण हेरून गायन आणि अभिनयात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दहावीनंतर दिग्दर्शक जयदेव हट्टंगडी यांच्याकडे नाट्य अभिनयाचा ३ महिन्याचा कोर्स केला. लहानवयात नृत्याचे सादरीकरण करताना स्टेज डेअरिंग वाढले याचा फायदा अभिनय करताना झाला. गोष्ट तुझी माझी हे नाटक त्यांनी साकारल त्यात गाणं गाण्याची आणि नृत्य सादर करण्याची नामी संधी त्यांना मिळाली. माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेत देखील त्यांनी छोटासा अभिनय साकारला त्यानंतर झी वाहिनीच्या येऊ कशी तशी मी नांदायला ह्या मालिकेतून मोहितच्या आई साकारली आणि आता पुन्हा त्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. “कोमल धांडे-पाठारे” ह्यांना ह्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here