रविना टंडन ९० च्या दशकातील बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते आजही तिचे चित्रपट पहिले जातात. गोविंदा, अमिताभ बच्चन , अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान, नाना पाटेकर, अनिल कपूर, संजय दत्त, अमीर खान ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रविणाचे वडील बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध डायरेक्टर आणि बॉलीवूडचे सुपर व्हिलन म्हणून ओळखले जाणारे मैक मोहन (मोहन मॅकिजनी) हे रविणाचे मामा, त्यांच्यामुळेच राविनाला बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळाली असं म्हटलं जात. सलमान सोबत पत्थर के फुल ह्या चित्रपटातून प्रमुख अभिनेत्री म्हणून तिने पदार्पण केलं.

नुकताच तिच्याबद्दलच्या एक किस्सा गाजतोय त्याबाबद जाणून घेऊयात.. बऱ्याच वर्षांपूर्वी रविना टंडन सेटवर गाण्याचा डान्स करत असताना एक ११ वर्षांचा मुलगा तेथे ते शूटिंग पाहायला आला. रवीनाने त्यावेळी डायरेक्टरला सांगून त्यामुलाला तेथून काढायला लावले होते. तो मुलगा होता रणवीर सिंह. एका कार्यक्रमाच्या वेळी रणवीर सिंहने हा किस्सा प्रेक्षकांशी शेअर केला होता. पण त्याला तेथून का काढण्यात आलं हे मात्र तेथे त्याने सांगितलं नव्हतं. जेव्हा अभिनेत्री रविना टंडन हिला मीडियाने तुम्ही रणवीरला तेथून का काढले असा प्रश्न विचारला तेंव्हा रवीनाने देखील हे मान्य केलं कि हो मी डायरेक्टरला सांगितले कि त्या लहान मुलाला तेथून काढा. पुढे तिने ह्यावर स्पष्टीकरण देत म्हणाली मला लहान मुलं खूप आवडतात सेटवर देखील तुम्ही मला अनेक लहान मुलांसोबत पाहिलं देखील असेल. पण त्यावेळी तेथे शूट होत असलेलं गाणं हे लहान मुलांसाठी अजिबात नव्हतं. त्या गाण्यामध्ये असे काही सीन घेण्यात आले होते जे लहान मुलांसाठी योग्य नव्हते. ज्यावेळी माझं लक्ष त्याच्याकडे गेलं तेंव्हा मी ताबडतोब डायरेक्टरला सांगून त्याला तेथून जाण्यासाठी सांगितलं.

रणवीरचे सिंह ह्याचे खरे नाव रणवीर भावनानी असे आहे. त्याने मुंबईतील एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला, रणवीरला कळले की चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळवणे इतके सोपे नाही, कारण बहुतेक चित्रपट पार्श्वभूमी असलेल्या लोकांना ही संधी मिळाली. अभिनयाची कल्पना “खूप दूरवरची” आहे असं वाटून रणवीरने सर्जनशील लिखाणावर लक्ष केंद्रित केले. तो अमेरिकेत गेला आणि तेथे त्यांनी इंडियाना युनिव्हर्सिटीमधून कला शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुन्हा तो अभिनयाकडे वळला २०१० मध्ये रणवीरला यश राज फिल्म्सच्या कास्टिंग विभागाचे प्रमुख शानो शर्मा यांनी ऑडिशनसाठी बोलावले आणि तेथूनच त्याच्या अभिनयाची सुरवात झाली.