फुलाला सुगंध मातीचा मालिकेत जिजीअक्काची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “अदिती मूलगुंड- देशपांडे” यांनी . स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यातील कीर्ती, शुभम या प्रमुख भूमिकेइतकीच जिजीअक्काच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळत आहे. अदिती देशपांडे यांच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… अदिती देशपांडे यांनी ” पेहरेदार पिया की” या हिंदी मालिकेत महत्वाची भूमिका बजावली होती. नॉट ओन्ली मिसेस राऊत, जोगवा, दशक्रिया ह्या त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिनेत्री अदिती देशपांडे या प्रसिद्ध अभिनेत्री “सुलभा देशपांडे” यांच्या सून आहेत. सुलभाताई देशपांडे ह्या पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर.

छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. याचदरम्यान राज्यनाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका त्यांनी गाजवल्या ह्यावरूनच त्यांचा हिंदी मराठीतील दांडगा अनुभव प्रत्ययास येईल. रंगभूमीमुळेच सुलभाताईची आणि अरविंद देशपांडे ह्यांची ओळख झाली. जवळपास दोन वर्षे त्यांनी प्रेमाच्या आणाभाका गिरवल्या आणि रंगभूमी सोडणार नाही ह्या वचनावर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर “निनादचा” जन्म झाला. १९६७ साली “शांतता कोर्ट चालू आहे” हे सुलभा ताईंनी अभिनित केलेले नाटक तुफान गाजले . त्यात त्यांनी साकारलेली लीला बेणारेची भूमिका अजरामर झाली. हाऊसफुल चे बोर्ड लावले अरविंद देशपांडे ह्यांनी बहुतेक चित्रपटात विरोधी भूमिका साकारल्या. बाळाचे बाप ब्रह्मचारी , चाणी, शापित सारख्या अनेक हिंदी मराठी चित्रपटात त्यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. ” प्रेमाच्या गावा जावे ” ह्या नाटकाचे प्रयोग चालू होते याचदरम्यान ३ जानेवारी १९८७ रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघ्या सिने सृष्टीत शोककळा पसरली. “अविष्कार” चे संस्थापक म्हणून अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजही महोत्सव आयोजित केले जातात. त्यांच्या मृत्यूनंतर सुलभाताई डगमगल्या नाहीत उलट त्यांच्या पाठी रंगभूमीची अविरत सेवा अशीच चालू ठेवण्याचे व्रत त्यांनी निभावले. मिसेस तेंडुलकर, विजेता, दुनिया, खून भरी मांग, जादू का शंख, कस्तुरी, अल्पविराम, अस्मिता सारख्या मालिका चित्रपट साकारत तब्बल ३४ पेक्षा जास्त जाहिरातीत काम करून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ब्रँड ऍम्ब्यासिडर बनल्या. अखेर ४ जून २०१६ रोजी सुलभाताई देशपांडे यांचे निधन झाले आणि एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.