२०२० साली अभिनेत्री ऋचा आपटे आणि क्षितिज दाते यांनी गुपचूप साखरपुडा केला होता ‘गेल्या वर्षी ह्याच दिवशी’ असे कॅप्शन देऊन त्यांनी साखरपुड्याचे फोटो २०२१ साली चाहत्यांसोबत शेअर केले होते. क्षितीज आणि ऋचाने ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्रीत काम केले होते. एकत्रित काम करत असताना सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते जुळले. त्यानंतर हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. क्षितीजची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली होती. आता लवकरच तो ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

तर ऋचाने ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे. क्षितिज आणि ऋचा हे दोघेही आज विवाहबद्ध झाले आहेत. पुण्यात अगदी साधेपणाने आणि मोजक्या मित्रमंडळींसमवेत त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. स्वतः त्यांनी ही माहिती मीडियाला दिली नसली तरी जवळच्याच मित्रांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. क्षितिज आणि ऋचा या दोघा नवदाम्पत्याना आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…