सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे ज्यातून आपना सर्वांनाच खूप साऱ्या चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव पाहायला मिळतो. मात्र त्यातून कुठली गोष्ट निवडायची हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठरलेलं असतं. काही चांगल्या गोष्टीवर समाजमध्यातील लोकांमध्ये चर्चा देखील झालेली पाहायला मिळते मग त्यातुन येणाऱ्या संकल्पनांना शेअर देखील केले जाते. अभिनेता भरत जाधव याने देखील अशीच एक पोस्ट शेअर करून नवी संकल्पना चाहत्यांसमोर मांडली आहे. अर्थात सोशल मीडियावरची त्याला आवडलेली ही पोस्ट शेअर करून आजच्या घडीला साजेसा असा एक उपाय त्याने सुचवला आहे ही पोस्ट कोणी लिहिली त्याबाबत अधिक माहिती नसली तरी या पोस्टमध्ये त्या व्यक्तीने नेमके काय लिहिले ते पाहुयात…

“एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे…माझ्या सोसायटीमध्ये 4जण पॉजिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकाचे फ्लॅट 1 bhk, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटीमधील 2 रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉजिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले…दार उघडून जोतो जेवण, नाश्ता-औषधे देत होता, रिकाम्या फ्लॅट धारकांचा 6 महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले….15 दिवसांनी सर्वजण बरे झाले. आता तेच फ्लॅट इमर्जन्सी साठी राखून ठेवले आहेत..हा छोटासा माझा प्रयत्न.. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा…हीच वेळ आहे पुढे होऊन आपले कर्तव्य करण्याची..”
भरत जाधव ने सोशल मीडियावरची ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. आजच्या घडीला ही उपाययोजना निश्चितच कामी येईल याची खात्री पटते अर्थात सर्वांनी एकजूट आणि सामंजस्याने ही वेळ मार्गी लावणे तितकेच महत्वाचे आहे. संकटकाळात अशा उपाययोजना आखल्या तर किमान थोड्या तरी अडचणींवर आपण सर्वजण निश्चितच मात करू शकू अशी एक आशा वाटते ही उपाययोजना सगळीकडे अमलात आणली तर येणारा काळ आपल्यासाठी काहीतरी चांगली बातमी देऊन जाईल याच अनुषंगाने भरत जाधव ने ही पोस्ट शेअर केली आहे.