श्रीयुत गंगाधर टिपरे ही लोकप्रिय मालिका आजही सर्वांच्या चांगलीच स्मरणात आहे ,त्यातील शिऱ्याचे पात्रही अनेकांना आठवत असेलच. आज हा शिऱ्या कुठलाही गाजावाजा न करता एक कोविड योद्धा बनून समाजकल्याणाचे काम करत आहे, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तो एक कोविड योद्धा बनून जे कार्य करत आहे त्याची दखल नुकतीच मीडियाने घेतलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळीकडेच त्याचे कौतुक होताना दिसत आहे पाहुयात तो कशा पद्धतीने ही मदत करत आहे ते….

मालिकेतील शिऱ्याचे पात्र साकारले आहे अभिनेता “विकास कदम” याने . ९० च्या दशकातील ऑल द बेस्ट नाटकातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली होती. पुढे श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकट फु, मर्डर मेस्त्री, विट्टी दांडू , नारबाची वाडी, सिंघम, गोलमाल रिटर्न्स सारख्या हिंदी मराठी चित्रपटातून अभिनेता, स्क्रीनप्ले रायटर, स्टोरी रायटर ते व्होकॅलिस्ट बनून बॉलिवूड पर्यंत मजल त्याने मारली आहे. परंतु अभिनयापासून थोडा दूर असलेला विकास गेल्या सात ते आठ महिन्यांपासून एका सामाजिक कार्यात व्यस्त असलेला दिसतो. कुठलाही गाजावाजा न करता मागील काही महिन्यांपासून तो बिकेसीमधील टेस्टिंग लॅबमध्ये काम करत आहे. मीडियाशी बोलताना तो म्हणाला की “कोवि’ डची पहिली लाट आली त्यावेळीसुद्धा मी मास्क आणि सॅनिटाइझर यांचं मोठ्या प्रमाणावर वाटप केलं होतं. यादरम्यान माझ्या एका मित्राने फार्मा केल्याने आम्ही दोघांनी मिळून लॅब सुरू करून एक मदतीचा हात द्यायचा ठरवलं होतं. गेल्या आठ महिन्यांपासून ही लॅब २४ तास चालू असून वांद्रे आणि कुर्ला इथली मुलं या लॅबमध्ये कार्यरत आहेत . हे काम करत असताना मलासुद्धा दोन वेळा को” रो” नाची लागण झाली होती.” असे तो यावेळी म्हणाला.