अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाने त्यांनी साकारलेल्या पात्राला अभिनयाने जिवंत ठेवतात. बॉलीवूड मधील अभिनेते शफी इनामदार देखील त्यांपैकी एक. रत्नागिरीच्या पांगरी दापोली भागातील शफी तेथेच शालेय शिक्षण घेऊन मुंबईत आला. मुंबईच्या सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेऊन आता अभिनयाकडे वळायचं असं ठरवलं. विजया या चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. ये जो है जिंदगीसह अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये त्यांनी काम केले. आज की आवाज मधील इन्स्पेक्टर, आवम मधील खलनायक आणि नजराना, अनोखा रिश्ता, अमृत यांसारख्या चित्रपटातील नायकाचा मित्र या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश आहे. कुदरत का कानून, जुर्म, सदा सुहागन आणि लव्ह 86 हे त्यांचे इतर काही चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आजही आवडतात.

अनेकांना हे माहित नसेल कि शफी इनामदार यांनी एका मराठी अभिनेत्री सोबत विवाह केलं होत. त्या अभिनेत्रीच नाव “भक्ती बर्वे”. अभिनेत्री भक्ती बर्वे ह्या सांगली जिल्ह्यातील असून बालपणापासूनच त्या अनेक नाटकात काम करू लागल्या. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर वरील एक उत्तम निवेदिका म्हणून त्या आजही ओळखल्या जातात. घरकुल, गांधी आणि आंबेडकर, ती फुलराणी, आई रिटायर होतेय अश्या अनेक नाटकांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पडली. सदा सुहागन, कुदरत का कानून, विजेता अश्या काही बॉलीवूड चित्रपटात देखील त्या झळकल्या. प्रभाकर हि त्यांची छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका. हिंदी चित्रपटात काम करता करता त्यांची ओळख शफी इनामदार ह्यांच्याशी झाली आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. काही चित्रपटात ह्या दोघांनी एकत्रित भूमिका देखील साकारल्या आहेत. १९९० साली नाट्यक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन भक्ती बर्वे यांना गौरविण्यात आले होते. १३ मार्च १९९६ रोजी शफी इनामदार हे भारत आणि श्रीलंका यांचा सेमीफायनल सामना पाहत असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. श्रीलंकेने प्रथम बॅटिंग करत ८ बाद २५१ धाव केल्या होत्या पण भारताला ह्या धाव करता आल्या नाहीत.

भारताचे १२० धावातच ८ गाडी बाद झाल्याने प्रेक्षकांनी ग्राऊंडवर धिगाणा घातला होता. त्यामुळे हा सामना भारताला गमवावा लागला. ह्या सामन्यादरम्यान क्रिकेटर विनोद कांबळी ग्राउंडवरच रडला होता. पतीच्या निधनानंतर अभिनेत्री भक्ती बर्वे खचून गेल्या होत्या. अनेक दिवस त्या अभिनय क्षेत्रापासून दूर देखील राहिल्या. मात्र पुन्हा एकदा त्यांनी रंगभूमीवर यायचं ठरवलं स्वतःला सावरत त्यांनी पुन्हा नव्याने सुरवात केली. १२ फेब्रुवारी २००१ रोजी वाईला कामानिमित्त गेल्या असता रात्रीच्या २.४५ च्या परतीच्या प्रवासात मुंबई पुणे एक्सप्रेस रोडवर ड्रायव्हरच्या चुकीमुळे गाडीला अपघात झाला या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक कलाकारांनी त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली. एक उत्तम अभिनेत्री आणि निवेदिका असलेली भक्ती बर्वे गेल्याने मराठी सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली. मराठीच नव्हे तर हिंदीत देखील त्यांची भरीव कामगिरी होती.