मराठी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून संजय जाधव यांची ओळख आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिका यांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. २००८ साली त्यांनी चेकमेट या चित्रपटाची धुरा सांभाळली. अनिकेत चौधरी, स्वप्नील जोशी, राहुल मेहेंदळे, सोनाली खरे, संजय नार्वेकर, आनंद अभ्यंकर, विनय आपटे अशी स्टारकास्ट असलेला हा त्यानी दिग्दर्शित केलेला चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटांनंतर “रिंगा रिंगा” , “फक्त लढ म्हणा”, “दुनियादारी”, “प्यारवाली लव्हस्टोरी”, “गुरु”, “येरे पेरे पैसे”, “खारी बिस्कीट” असे एकामागून एक सुपरहिट चित्रपट निर्माण केले. इतकच नाही तर दिल दोस्ती दुनियादारी , फ्रेशर्स, अंजली अश्या अनेक टीव्ही मालिका बनवल्या. दिग्दर्शक संजय जाधव यांचं खरं आयुष्य कस आहे याची उत्सुकता अनेकांना लागून असते.

पण सोशल मीडियावर त्यांच्या बाबत अनेक अफवा पसरलेल्या पाहायला मिळतात. अभिनेत्री हर्षदा खानविलकर हि दिग्दर्शक संजय जाधव यांची पत्नी आहे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. पण ह्या सगळ्या अफवा आहेत. अभिनेत्री हर्षदा खानविलकर हि संजय जाधव यांची पत्नी नसून फक्त एक चांगली मैत्रीण आहे. सोशल मीडियावर त्यांच्या खऱ्या फॅमिली सोबत हर्षदा खानविलकर देखील पाहायला मिळतात. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या पत्नीचं नाव प्रोमिता जाधव असं आहे. pods सोल्युशनच्या क्रिएटिव्ह हेड म्हणून त्या काम पाहतात. संजय आणि प्रोमिता यांच्या मुलीचं नाव ध्रिती संजय जाधव असं आहे. ध्रिती जाधव हि एक उत्तम डान्सर आहे. चला हवा येउ द्या च्या मंचावर दिग्दर्शक संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीची ओळख करून दिली होती. एक उत्तर दिग्दर्शक म्हणून संजय जाधवांची ओळख आहे पण चांगला व्यक्ती म्हणून देखील ते तितकेच लोकप्रिय आहेत. सेटवरच नाही तर इतर कुठेही ते इतरांशी मिळून मिसळून राहिलेले पाहायला मिळतात. कसलाही गर्व न करता छोट्या कलाकारांना आणि पडद्या मागील कामगारांना देखील ते तितक्याच आपुलकीची वागणूक देताना पाहायला मिळतात.