Home Entertainment ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्याच्या घरी लग्नाची लगबग होणारी पत्नी देखील आहे अभिनेत्री

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेत्याच्या घरी लग्नाची लगबग होणारी पत्नी देखील आहे अभिनेत्री

1788
0
chetan wadnere wedding photo
chetan wadnere wedding photo

डिसेंबर महिना सुरु झाला आणि एकामागून एक मराठी कलाकारांची लग्न झालेली पाहायला मिळाली. राणा आणि अंजली हि छोट्या पडद्यावरील जोडही २ डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकली. त्यांनतर अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनी देखील त्याच दिवशी लग्न केलं. ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील सुमित पुसावळे याने मोनिका महाजन सोबत लग्नगाठ बांधली. तर ‘तुमची मुलगी काय करते’ मालिका फेम हरीश दुधाडे याने समृद्धी निकम या मॉडेल सोबत लग्नगाठ बांधली. डिसेंबर महिना सुरु झाल्यापासून मराठी कलाकार लग्न बंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. ह्यात आता आणखीन एका छोट्या पडद्यावरील अभिनेता आणि अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु आहे.

chetan and rujuta dharap wedding
chetan and rujuta dharap wedding

स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या ठिपक्यांची रांगोळी हि मालिका सुरु आहे. मालिकेतील शशांक हे मुख्य पात्र अभिनेता चेतन वडनेरे साकारताना पाहायला मिळत आहे. अभिनेता चेतन वडनेरे हा बऱ्याच दिवसांपासून एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. चेतन वडनेरे याने अभिनेत्री ऋजुता धारप हिच्यासोबत एक फोटो शेअर करत आहे या फोटोवरून यो अभिनेत्री ऋजुता धारप हिला डेट करत असल्याचे बोलले जात होते. अभिनेता चेतन वडनेरे हा झी मराठीवरील अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसला होता. झी युवा वरील फुलपाखरू या लोकप्रिय मालिकेत तो झळकला याच मालिकेत ऋजुता धारप देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसली. फुलपाखरू मालिकेतून चेतन आणि ऋजुता यांची ओळख झाली होती. आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि आता लग्नात होताना पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेत्री ऋजुता धारप हिने मेहेंदीचे काही विडिओ आणि फोटो शेअर करत लग्न करत असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दोघांच्या घरी लग्नाची लगबग असू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here