तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. तुझ्यात जीव रंगला मालिकेत वाहिनीसाहेब हे निगेटिव्ह पात्र तिने साकारलं होत मालिका संपण्यापूर्वीच तिने मालिकेतून काढता पाया घेतला. त्याच कारणही अगदी तसेच होत, अभिनेत्री धनश्री हि प्रेग्नेंट असल्यामुळे तिने मालिकेतून बाहेर जाणे पसंत केले होते. सध्या ती कोणतीही मालिका करताना दिसत नसली तरी वाहिनीसाहेब म्हणून मिळवलेली ओळख प्रेक्षक सहजासहजी विसरणार नाहीत.

नुकतच तिच्या बाळाचं बारसं झालं. बाळाच्या बारश्याचे अनेक फोटो तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत त्यात तिने आपल्या बाळाचं नाव देखील सांगितलं आहे. तिच्या बाळाचं नाव आहे “कबीर “. कबीर दिसायला अगदी छान आहे. आपल्या गोंडस मुलाचे फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. कबीर हे उत्तम नाव शोधलस असं देखील अनेकांनी कमेंट द्वारे कळवलं. सध्या जरी धनश्री मालिकांपासून दूर असली तरी येणारी काही दिवसात ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा आहे. तूर्तास अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा…