Home Entertainment अपूर्वा नेमळेकरचा नवा बिजनेस या प्रसिद्ध ठिकाणी सुरू केला व्यवसाय

अपूर्वा नेमळेकरचा नवा बिजनेस या प्रसिद्ध ठिकाणी सुरू केला व्यवसाय

5530
0
apoorva collection store
apoorva collection store

बऱ्याचशा मराठी अभिनेत्री अभिनया सोबतच वेगळ्या क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवतात. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील युट्युब चॅनलच्या माध्यमातून स्वतः बनवलेल्या रेसिपीज शेअर करत असतात यातून त्यांना उत्पन्न देखील मिळते या सोबतच त्यांचा ‘हंसगामीनी’ हा साड्यांचा ब्रँड सेलिब्रिटी विश्वात खूपच प्रसिद्ध आहे. तर अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित यांचा ‘तेजाज्ञा’ हा कपड्यांचा ब्रँड देखील प्रसिद्ध आहे. देवमाणूस मालिकेतील मंजुळा म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिने देखील पुण्यात स्वतःचे पार्लर उभारले आहे.

actress apurva nemlekar
actress apurva nemlekar

यासोबतच अभिनेत्री आरती वडगबाळकर हिचा देखील ‘कलरछाप’ नावाने साड्यांचा ब्रँड कला क्षेत्रात प्रसिद्ध आहे. या अभिनेत्री आज आपला व्यवसाय संभाळून अभिनय क्षेत्रात देखील सक्रिय असलेल्या पाहायला मिळतात. तर या व्यवसाय करणाऱ्यात आता आणखी एका अभिनेत्रीने उडी घेतलेली पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री आहे “अपूर्वा नेमळेकर”. अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंताची भूमिका गाजवत आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सीजनमधून अपूर्वाने साकारलेली शेवंता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेचा तिसरा सिजन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अपूर्वा बिजनेस वूमन म्हणूनही ओळखली जाते. आर्टिफिशिअल ज्वेलरी विकण्याचा तिचा व्यवसाय आहे. मात्र आता शाहूपुरी , सातारा येथे नुकतेच “अपूर्वा कलेक्शन” नावाने साड्या विकण्याचा व्यवसाय तिने सुरू केला आहे. कालच तिने आपल्या या व्यवसायाचे उदघाटन करून ही बातमी चाहत्यांना कळवली आहे. या ठिकाणी नागरिकांसोबत अपूर्वा आणि तिची आई देखील उपस्थित होते.

apurva nemlekar store
apurva nemlekar store

अपूर्वाचे साडी कलेक्शन पाहण्यास आणि त्या साड्या खरेदी करण्यास गिऱ्हाईकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली होती. सातारा येथील शाहूपुरी रोडवर शुक्रवार पेठ आहे. तेथील सरस्वती कॉम्प्लेक्स मध्ये तिने आपले हे प्रशस्त असे साड्यांचे दुकान थाटले आहे. “अपूर्वाजकलेक्शन” या नावाने तिची स्वतःची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला तिच्या कलेक्शनमधील ज्वेलरी डिझाइन पसंत करता येतील. ज्वेलरीच्या किंमती देखील तिने त्यात नमूद केलेल्या पाहायला मिळतील. मुंबईपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता थेट सातारकरांना देखील आता खरेदी करता येणार आहे त्यासाठी त्यांना आता मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. अपूर्वा नेमळेकरला तिच्या या व्यवसायात भरभराटीला मिळो आणि लवकरच पुन्हा ती आणखीन मालिकेत देखील पाहायला मिळो हीच सदिच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here