स्वप्नील जोशी सोबत समांतर ह्या नव्या सिरीज मध्ये तेजस्विनी पाहायला मिळतेय. अग्गबाई अरेच्चा चित्रपटातून खलनायिकेची भूमिका साकारून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. पदर्पणात विरोधी भूमिका साकारणारी ही अभिनेत्री विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. ये रे ये रे पैसा, देवा, एक तारा,7 रोशन व्हीला, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ, गैर राणभूल यासारख्या चित्रपटासोबतच १०० डेज या मालिकेतूनही तीने छोट्या पडद्यावर आगमन केले. दरवर्षी देवीच्या नवरात्रीच्या नऊ अवतारांची तिच्यावर साकारण्यात आलेली थीम नेहमीच चर्चेत राहिली आहे. अभिनयाचे हे बाळकडू तिला तिच्या आईकडूनच मिळाले आहे. मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित या तेजस्विनीच्या आई. मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटातून दोघी माय लेकीने सिंधुताईंची भूमिका साकारलेली पाहायला मिळाली.

तेजस्विनीला एक सख्खी बहीण देखील आहे परंतु मिडियासमोर ती फारशी कधी दिसलीच नाही. या कारणाने सोशल मीडियावरही तिचे फोटो फारसे पाहायला मिळत नाहीत. क्वचित प्रसंगीच तेजस्वीनीसोबत तिला पाहिले गेले आहे. तिच्या या बहिणीचे नाव आहे “पूर्णिमा पंडित पुल्लन”. पूर्णिमा ही तेजस्विनीची थोरली बहीण आहे टेक्सासमध्ये ऑस्टिन शहरात ती वास्तव्यास होती. परंतु काही वर्षापूर्वीच ती भारतात परतली असून आपल्या कुटुंबासोबत पुणे शहरात स्थायिक झाली आहे. तेजस्विनी आणि अभिज्ञा भावे यांच्या तेजाज्ञा या ब्रॅंडशीही ती निगडित आहे. बहुतेकदा या ब्रॅण्डसाठी स्पेशल असिस्टंट म्हणून तिने आपली जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय पूर्णिमाला कुकींगची देखील विशेष आवड आहे. इन्स्टाग्राम वरून ती नेहमीच स्वतः बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो शेअर करत असते. तेजस्विनी आणि पूर्णिमा या दोघी बहिणींच्या दिसण्यात देखील खूपच साम्य दिसून येते. अर्थात मराठी सृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे बहीण भाऊ दिसायला अगदीच सेम दिसतात. त्यात गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. गौतमी आणि मृण्मयी दोघी बहिणी टीव्ही मालिका, चित्रपट या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांसमोर येतात परंतू पूर्णिमा या क्षेत्रापासून काहीशी दूरच असलेली पाहायला मिळते याच कारणामुळे ती प्रकाशझोतात कधी आली नाही.