आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसले हिने नुकताच एका शो मध्ये तिच्या पूर्वायुष्याबद्दलचा खुलासा केला आहे. तिच्या वडिलांना तिच्या काकांनी एका स्कीम मध्ये पैसे लावायला सांगिले होते. भावावर विश्वास ठेऊन होते नव्हते तेवढे सगळे पैसे तिच्या वडिलांनी काकांना दिले. पुढे ती स्कीमच गायब झाली आणि संपूर्ण कुटुंबाला मोठा फटका सहन करावा लागला. काकांनी राहत घर देखील विकून टाकलं त्यामुळे सर्वाना रस्त्यावर राहायची वेळ आली. अश्यातच आईला २ दा हृदयाचा झटका देखील आला.

अश्या परिस्थितीत वडिलांच्या मित्रांनी १ दिवस राहायची सोय केली रात्र कशीबशी निघाली दुसऱ्या दिवशी मात्र पैसे नसल्याने त्यांना जुन्या गुरे नसलेल्या गोठ्यात राहायला लागलं. एका वेळच खायला मिळेल इतके पैसे देखील राहिले नव्हते. त्यावेळी अनेकदा आ’ त्म’ ह’ त्ये चा विचार मनात आला. ९ व्या इयतेत असल्यापासून तिने परिवारासाठी अपार मेहनत घेतली पुढे मालिकांत छोटेमोठे रोल केले आणि आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूप हाल अपेष्ठा सहन करत न थकता न डगमगता स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे जाण्याची जिद्द बाळगली आणि ते त्यात यशस्वी देखील झाले. तुम्ही कोण आहेत ह्या पेक्षा तुम्हाला काय करता येत आणि त्यासाठी तुम्ही किती धडपड करता ह्यावर तुमचं उद्याच भविष्य अवलंबून असत. आपल्याकडे काही नाही आता काही उरलं नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा जिद्द बाळगली तर उद्या नक्कीच चांगले दिवस येतील. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.