हिंदी बिगबॉस सुपरहिट ठरल्यानंतर मराठी प्रेक्षकांसाठी मराठी बिगबॉस सुरु करण्यात आलं. मराठी बिगबॉसच्या पहिल्याच सिजनमध्ये अनेक मराठी अभिनेत्यांनी बिगबॉसच्या घरात प्रवेश केला. ह्यामध्ये अभिनेता राजेश श्रुंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांची जोडी चांगलीच गाजली. हिंदी अभिनेते आणि अभिनेत्रीं प्रमाणे मराठी बिगबॉसच्या घरात देखील अभिनेते आणि अभिनेत्रींची जवळीक पाहायला मिळाली. अनेक वाद विवाद आणि प्रेक्षकांनी नाराजी दर्शविल्यानंतर बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर अभिनेता राजेश श्रुंगारपुरे याने मीडियासमोर येऊन हा फक्त बिगबॉसच्या खेळाच्या प्रसिद्धीसाठी हा खेळ रचल्याचा सांगितलं गेलं. अभिनेत्री रेशम टिपणीस हिनेदेखील अशीच प्रतिक्रिया दिली होती.

अभिनेते राजेश श्रुंगारपुरे याने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांत काम केले आहे. घर संसार, चंद्रगुप्त मौर्य, श्री गणेश, साहिब बीवी गुलाम, ओम नमो नारायण, झांसी कि राणी अश्या अनेक मालिकांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या. तर सरकार, श्री शंभू माझा नवसाचा, स्वराज्य, शॉर्टकट रोमिओ, गुरु दक्षिणा , डॅडी, युद्ध, नशीबवान अश्या एक ना अनेक चित्रपटात त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. २०१८ साली त्यांनी मराठी बिगबॉसच्या घरात प्रवेश केला होता पण घरातून बाहेर पडल्यापासून त्याने हिंदी मालिका करण्यावर भर दिलेला पाहायला मिळाला. हिंदीत अनेक ऐतिहासिक मालिका तो सध्या करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच राजेश श्रुंगारपुरे यांच्या आईचे निधन झाले अशी वाईट बातमी समोर आली आहे. वडिलांच्या पश्चात आईने राजेशचा सांभाळ केला आहे. त्यामुळे अभिनेता राजेश श्रुंगारपुरे भावुक झालेला पाहायला मिळत आहे. आज त्यांच्या आईचे अस्थीविसर्जन करतानाचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत हि वाईट बातमी दिली. अनेक अभिनेते अभी अभिनेत्रींनी सोशल मीडियावर त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. ईश्वर त्यांच्या आईच्या आत्म्यास शांती देवो हीच इच्छा..
