कलर्स मराठी वरील सूर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होऊन “गायिका राधा खुडे” हिने तिसरा क्रमांक पटकावला होता. १३ जून २०२१ रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात सहा स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात पात्र ठरले होते. त्यात राधा खुडे, रश्मी मोघे, प्रज्ञा साने, सन्मिता धापटे, संपदा माने आणि निधी देशपांडे या स्पर्धकांनी महाअंतिम फेरीत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. २१ जुलै २०२१ रोजी राधा खुडे विवाहबद्ध झाली असून ही बातमी तिने इंस्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांना कळवली आहे. को’रो”नाच्या पार्श्वभूमीवर आणि काही तांत्रिक अडचणींमुळे ही बातमी सांगायची राहून गेली असे म्हणून तिने आपली दिलगिरी व्यक्त केली आहे.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील राधा खुडे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मली. तिची आई शीला खुडे या भाजी विक्री करतात आणि हे काम झाल्यावर घरी जाऊन शिलाई मशीनवर काम करतात. तर वडील दत्तू खुडे हे देखील छोटा मोठा व्यवसाय करून संसाराचा गाडा चालवतात. अशातच राधाने मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबाला मोठा आनंद देऊन गेला आहे. सूर नवा ध्यास नवा हा शो झाल्यावर राधा खुडेचे तिच्या गावात जंगी स्वागत करण्यात आले होते तर अनेक वृत्तपत्रांनी तिच्या या विजयाचे कौतुक केले. चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होत वाट ’…., ‘बाजाराला विकण्या निघाली,दही दुध ताक आणि लोणी, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी’ …,‘मल्हारी भाेळा, जीवींचा जिव्हाळा… काय सांगू त्याची मी कहाणी…’ ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा ’ या गाण्यांनी तिने महाराष्ट्र मंत्रमुग्ध केला होता. राधाच्या हटके आवाजाने महाराष्ट्राला वेड लावले होते. आपल्या सुंदर गायकीने तिने या शोमध्ये आठवड्याला ठरणाऱ्या राजगायिका होण्याचा बहुमान देखील पटकावला होता. इंदापुरची लेक म्हणून अनेक चाहते तिच्या विजयाची आस धरून होते. मात्र त्यांची निराशा न करता राधाने तिसरा क्रमांक पटकावून इंडपूरकरांचा आनंद वाढवला होता. गावात जेवहा तिचे आगमन झाले त्यावेळी फटाके, ढोल ताश्यानी तिचे जंगी स्वागत केले होते. सूर नवा ध्यास नवा ह्या शोमुळे राधा खुडे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. आता ती विवाहबंधनात अडकल्याचे समजताच तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राधा खुडे हिला वैवाहिक जीवनाच्या या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…