आज मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामुळे कलाकार मंडळींना त्याचा खूपच फायदा झालेला पाहायला मिळतो. कलाकार आपले डान्स, गाणे किंवा एखादी कला आपल्या मोबाईलने शूट करून ती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना ह्यात यश येते तर काहींची निराशाही होते. आज आपण अश्याच एका मुलीबद्दल जाणून घेणार आहोत जी कृषी कन्या म्हणून रातोरात प्रसिद्ध झाली. काही दिवसांपासून सोशिअल मीडियावर एका लहानगीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतोय त्यात एक मुलगी शेतात डान्स करताना दिसते आणि तिचे वडील मागे शेतात पिकांना फवारा मारत तिला साथ देतात. अनेकांना उत्सुकता आहे कि हि मुलगी नक्की आहेत तरी कोण? चला तर मग जाणून घेऊयात ह्या कृषिकन्नेबद्दल …

कृषिकन्या म्हणून रातोरात प्रसिद्ध झालेली ह्या लहानग्या मुलीचं नाव आहे “कृपा वाकचौरे”. कृपा हि ७ वर्षांची असून ती अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव ह्या छोट्याश्या गावची लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड. कृपा वाकचौरे हिचे वडील दीपक वाकचौरे ह्यांनी तिला साडेतीन वर्षाची असल्यापासूनच डान्स शिकण्यासाठी प्रोत्साहित केले. कृपा एक चांगली नृत्यांगना होईल हे तिच्या मावशीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला आई वडिलांनी pvr डान्स अकॅडमीचे शिक्षक प्रशांत दिवेकर ह्यांच्याकडे घेऊन गेले. पण ती खूपच कमी वयाची असल्याने तिला त्यांनी घेण्यास टाळलं तेंव्हा वडिलांनी त्यांना तिच्या डान्सचा एक व्हिडिओ पाठवला जो पाहून प्रशांत भारावून गेला. त्यानंतर प्रशांत सरानी तिला डान्स शिकवायला सुरवात केली आता डान्स शिकून तिला जवळपास ३ वर्ष होत आली. ३ वर्षात कृपेने खूपच प्रगती केलीली पाहायला मिळते. फक्त कृपाच नाही तर अनेक बालकलाकार आणि यंग मुलामुलींना प्रशांत सरांच्या अकॅडमीमुळे खूपच फायदा झाला आहे अनेकांना बक्षिसे देखील मिळाली आहेत. कृपाच इंस्टाग्रामवर स्वतःच अकाउंट देखील आहे ज्यात तिची आई तिचे डान्सचे व्हिडिओ मोबाईलने शूट करून अपलोड करते. आजवर तिने विविध गाण्यावर केलेले डान्स तुम्हाला तिच्या अकाउंटवर पाहायला मिळतील. “ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट” ह्या गाण्यावरील तिचा शेतात केलेला डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय.