Home News या प्रसिद्ध मराठी मराठी अभिनेत्रीची लगीनघाई…

या प्रसिद्ध मराठी मराठी अभिनेत्रीची लगीनघाई…

1836
0
ruchita jadhav wedding photos
ruchita jadhav wedding photos

मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून लगीनघाई सुरू झालेली दिसत आहे. काल म्हणजेच ३० एप्रिल रोजी रुचिताच्या घरी ग्रहमुख पूजेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात रुचिता जाधव हिला आनंद माने यांनी प्रपोज केले होते. त्यानंतर तीने मीडियाशी बोलताना सांगितले होते की ३ मे रोजी आम्ही मोजक्या मित्रमंडळींसमवेत पाचगणी येथिल एका प्रायव्हेट फार्म हाऊसमध्ये लग्न करणार आहोत. रुचिताचा होणारा नवरा आनंद माने हा एक बिजनेसमन असून माने डेव्हलपर्सचा तो डायरेक्टर आहे. मराठी सृष्टीला लाभलेला ग्लॅमरस चेहरा म्हणून रुचिताला मराठी सृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली आहे.

actress ruchita jadhav wedding photos

भरत जाधव सोबत काही चित्रपटात तिने कामही केले आहे. लव लग्न लोचा, मनातल्या उन्हात, माणूस एक माती, भुताचा हनिमून या चित्रपटातून रुचिताने अभिनय साकारला असून मालिका, चित्रपट असा प्रवास तिचा चालूच आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाची नुकतीच दखल घेण्यात आली असून काही दिवसांपूर्वी पूर्व युरोप आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने तिला गौरविण्यात आले हया चित्रपटातील तिच्या अभिनयाला ‘गोल्ड अवॉर्ड बेस्ट ऍक्टरेस’ या पुरस्काराने तिला नावाजले गेले आहे. रुचिता आता लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे, आज १ मे रोजी मेहंदी सोहळा पार पडणार असून २ तारखेला हळद आणि संगीत सोहळा पार पडणार असल्याचे तिने मीडियाशी बोलताना सांगितले होते. रुचिता आणि आनंद यांची ओळख गेल्या वर्षी झाली होती. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि मागच्याच महिन्यातील ९ एप्रिल रोजी आनंदने तिला प्रपोज देखील केले होते, ३ मे रोजी पार पडत असलेल्या या लग्न सोहळ्याला मोजक्याच मित्रमंडळींना तीने आमंत्रित केले आहे मात्र लग्नानंतर एक मोठी पार्टी आयोजित करण्यात येईल ज्यात मराठी इंडस्ट्रीतील माझ्या सहकलाकार आणि मित्रांना आमंत्रित करण्यात येईल असेही तिने त्या मुलाखतीत नमूद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here