अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या यशानंतर अग्गबाई सुनबाई ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केली जात आहे. मालिकेतील प्रमुख पात्र बबड्या आणि शुभ्रा बदलली असली तरी कथानकात थोडाफार बदल केलेला दिसून आला. बबडू आणि बबड्याला सुधारता सुधारता आसावरी आता शुभ्रालाही योग्य ते मार्गदर्शन करताना दिसत आहे त्यामुळे आजच्या घडीला सांसारिक गृहिणीने कसे धीट राहावे , येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जावे याचे धडे देताना दिसत आहे. यातच आता बबड्याच्या आयुष्यात सूझान आली असून ही व्यक्ती बबड्याला आपल्या जाळ्यात कसे ओढते हे दर्शवले जात आहे. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही गोष्टी जाणून घेऊयात..
सुझान हे पात्र साकारले आहे अभिनेत्री “गीतांजली गणगे” हिने. गीतांजली गणगे ही थेटर आर्टिस्ट आहे . “अगं, ऐकलंस का!” हे तीन अभिनित केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक. अभिनेता आशुतोष कुलकर्णी ह्याच्यासोबत गीतांजलीने या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. हे विनोदी नाटक असलं तरी नव्या नवरीची घुसमट तिने प्रभावीपणे मांडली होती. ‘चिडीयाघर’ या सब टीव्ही वरील हिंदी मालिकेतूनही ती झळकली आहे. गीतांजली अभिनयाप्रमाणेच मॉडेलिंग क्षेत्रातही कार्यरत आहे. अग्गबाई सुनबाई या मालिकेत तिला विरोधी भूमिका साकारायला मिळाली आहे. खऱ्या आयुष्यातही गीतांजली सुझान इतकीच ग्लॅमरस जीवन जगत आहे हे तिच्या फोटोंवरून लक्षात येईल. विरोधी भूमिका आणि झी मराठीची मालिका यामुळे सुझान हे पात्र तीच्या कारकिर्दीत अधोरेखित करणारे ठरेल यात शंका नाही. गीतांजली गणगे हिला या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…