Home Movies “नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात?

“नाकावरच्या रागाला औषध काय..” गाण्यातील हे बालकलाकार आठवतात?

2495
0
nakavarchya ragala aushadh kay actress
nakavarchya ragala aushadh kay actress

कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यासारखे दमदार कलाकार लाभले होते. या चित्रपटासोबतच त्यातील ‘हे एक रेशमी घरटे..’ आणि ‘नाकावरच्या रागाला औषध काय…’ ही गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यात हे दोन बालकलाकार देखील झळकलेले पाहायला मिळाले. ‘बच्चू’ आणि ‘छकुली’ अशा भूमिका साकारणाऱ्या या बालकलाकारांबद्दल आज जाणून घेऊयात…चित्रपटात बच्चू साकारला होता “ओमेय आंब्रे” या बालकलाकाराने तर छकुली साकारली होती “मृण्मयी चांदोरकर” हिने.

ओमेय आंब्रे आज अभिनय क्षेत्रापासून खूप दूर असलेला पाहायला मिळत आहे. मुंबईतील आर ए पोदार कॉलेजमधून त्याने बीकॉमची पदवी मिळवली आहे. ओमेयचे लग्न झाले असून त्याला दोन मुलंही आहेत. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत न्यू जर्सी येथे स्थायिक झाला आहे. तर चित्रपटातली छकुली अर्थात मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे. व. पू. काळे यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे. एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यातील ही वाट एकटीची, ठिकरी, साथी अशी पुस्तके खूपच प्रसिद्धी मिळवून गेली. त्यांची मुलगी “स्वाती चांदोरकर” या देखील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. एक पायरी वर, अनाहत, काळाक भिन्न, शेष, उत्खनन ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. “मृण्मयी चांदोरकर” ही स्वाती चांदोरकर यांचीच मुलगी. एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही. मृण्मयीचेही लग्न झाले असून ती आपल्या घर संसारात रमली आहे शिवाय स्टार इंडियाशी ती निगडित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here