अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने काल एक महत्वाचा निर्णय घेतला. काही काळासाठी ती सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचे तिने आपल्या चाहत्यांना कळवले आहे. Temporarily closed for, Spiritual and Physical Maintenance. असे म्हणून तात्पुरता सोशल मीडियाचा वापर करणार नसल्याचे सांगितले आहे. तिच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर अनेकांनी तिच्या या मताचे स्वागत देखील केलं आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत स्नेहलता वसईकर हिने सोयरा मातोश्रींची भूमिका सजग केली होती. या भूमिकेचे आणि तिच्या अभिनयाचे खूप कौतुक देखील करण्यात आले होते.

स्नेहलता वसईकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या स्नेहलता तावडे. फु बाई फु मधून तिने मराठी सृष्टीत पदार्पण केले होते. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या. बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटात तिने भानू चे पात्र सकारले होते. काही हिंदी मालिकेतून अभिनय साकारत असताना तिने चला हवा येऊ द्या च्या मंचावरून विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता याशिवाय काही शो चे सूत्रसंचालन तिने केलेले पाहायला मिळाले. गिरीश वसईकर या दिग्दर्शकासोबत तिने लग्नगाठ बांधली. शौर्या ही तिची एकुलती एक मुलगी. शौर्या देखील आईप्रमाणे अभिनयाची आवड आहे शिवाय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यात तीला आईकडून नेहमी प्रोत्साहन मिळते. परंतु या सर्व व्यस्त शेड्युलमधून स्वतःला वेळ देता यावा आणि चंदेरी दुनियेपासून काही काळासाठी ब्रेक घ्यावा असे प्रत्येकालाच वाटत असते . याच कारणामुळे स्नेहलता वसईकर हिने सोशल मीडियाला काही काळ दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाचे स्वागत पण पुन्हा त्याच दमाने तिने प्रेक्षकांसमोर यावे हीच एक सदिच्छा…