अभिनयाची कुठलीही पार्श्ववभूमी नसताना अभिनेत्री साई ताम्हणकरने मराठी सिनेसृष्टीत आपलं पाऊल टाकत चांगलं यश संपादन केलं. मराठीच नाही तर आता बॉलीवूड चित्रपटांत देखील ती चांगलाच धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सईला मिनी फिल्मसाठी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मराठी सिनेसृष्टीत तिची वाहवाह देखील करण्यात आली. आपण आपल्या कामात लक्ष घालून कायम काम करत राहील तर यश नक्कीच मिळतं हे तिने वारंवार आपल्या कामातून दाखवून दिल आहे. येत्या काही दिवसातच सई ग्राउंड झिरो या चित्रपटात आणि इंडिया वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे प्रसिद्धीकडे तीच आणखीन एक पाऊल पडणार हे निश्चित..

पण सध्या चर्चा आहे ती सईने दिलेल्या एका मुलाखतीची. या मुलाखतीत सई ताम्हणकर हिने आपल्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याबद्दल खुलासा केलेला पाहायला मिळतो. अभिनेत्री सई ताम्हणकर हिने एका प्रसिद्ध व्यक्तीशी लग्न केलं होत. २०१३ साली अमेय गोसावी सोबत तिने मोठ्या थाटात लग्न केले होते. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय तिच्या एकटीच नसून दोघांनी सहमतीने आणि विचार पूर्वक निर्णय घेतला असल्याचं ती म्हणते.ती म्हणते “अमेय आणि मी आजही एकमेकांना भेटतो एकमेकांशी बोलतो आणि हे सगळं मी शब्दात सांगू शकत नाही. ज्यावेळी आम्ही घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात गेलो होतो. त्या दिवशी कागदपत्रांवर सही केल्यानंतर आम्ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला आम्ही आमच्या मित्रमंडळींना बोलावलं होतं आणि तिथेच घटस्फोटाबद्दल आम्ही जाहीर केले होते. अर्थात ह्या आमच्या निर्णयाबाबाद तेथे उपस्तित व्यक्तींना आम्ही ह्याची काहीच कल्पना दिली नव्हती. त्यामुळे आमही ती पार्टी एन्जॉय करू शकलो. त्यावेळी आम्ही सगळे खूपच प्यायलो होतो. अमेयच्या नावाचा एक टॅटू मी लग्नानंतर काही दिवसांनी काढला होता आजही तो तसाच आहे. ती आठवण मी आजही जपून ठेवली आहे. या आठवणी पुसून टाकण्यात काय अर्थ आहे? आपल्या आयुष्यात अशी एक वेळ येते जे तुम्हाला चांगलं वाटतं. त्यामुळे मी आजही तो टॅटू मिरवते.”

सई ताम्हणकर हि एक बिनधास्त आणि सर्व गोष्टी उघडपणे बोलणारी आजच्या काळातील टॉपची अभिनेत्री आहे. तिला विचारलेल्या प्रश्नांवर ती मनमुरादपणे बोलताना पाहायला मिळते. तिने ह्यावेळी आणखीन एक वेगळा किस्सा मांडला. ती म्हणते ” मला फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं त्यावेळी जेंव्हा मी रेडकार्पेटवर एन्ट्री केली तेव्हा मीडियाने दुसरीकडे कॅमेरा फिरवला. त्यावेळी तेथे उपस्तित लोकांपुढेच नाही तर संपूर्ण चायनलवर माझा अपमान करण्यात आला. हा झालेला माझा अपमान मी माझ्या कामातून सिद्ध करून दाखवेल, मी ह्याचा बदल नक्कीच घेणार पण तो बदल माझ्या कामातून मी सिद्ध करून दाखवेल. एक दिवस असा येईल कि हे सर्व लोक माझ्याकडे पाठ फिरवण्या ऐवजी माझी आतुरतेने वाट पाहतील आणि हे नक्की होणारच मी ते करून दाखवेल.