Home Entertainment ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ह्या अभिनेत्रीला ओळखलंत?

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ह्या अभिनेत्रीला ओळखलंत?

2263
0
yeu kashi tashi mi nandayla actress
yeu kashi tashi mi nandayla actress

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत सध्या धक्कादायक वळण घडणार आहे. मोहित चिण्याला ट्रेनमध्ये त्रास देताना दिसत आहे…यामुळे चिण्या ट्रेनमधून खाली पडताना दिसतो. पुढे चिण्याचे काय होणार ? तो या अपघातातून सुखरूप वाचेल का? हा प्रश्न आता प्रेक्षकांसमोर उपस्थित होतो. मालिकेतल्या वेगवेगळ्या घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत तर आहेच पण आज या मालिकेतील अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपल्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ही अभिनेत्री आणि मीरा जगन्नाथ. मीरा जगन्नाथ मालिका क्षेत्रात कशी आली याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

actress mira jagtap
actress mira jagtap

मीरा जगन्नाथ हिने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोमो ची भूमिका साकारली आहे. मोमो हे पात्र सध्या विनोदी दर्शवले असले तरी तिचे गुपित अजून खानविलकर कुटुंबसमोर आलेले नाही. त्यामुळे पुढे जाऊन मोमो काय घडामोडी घडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही मूळची पुण्याची सुरुवातीला योगा प्रशिक्षक म्हणून ती पुण्यात कार्यरत होती. एक दिवस योगा करतानाचे मिराचे फोटो तिच्या विद्यार्थिनीने काढले आणि ते फोटो तिने जाहिरात एजन्सीला पाठवले. इथूनच मिराच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मॉडेलिंग क्षेत्रात मिराला अनेक ऑफर्स येऊ लागल्या. मॉडेलिंग करत असतानाच एक वाईट अनुभव देखील तिच्या वाट्याला आला होता. चित्रपटात काम देतो असे सांगून त्या माणसाने मिराचा हात पकडला होता. हा अनुभव आल्यावर काम मिळवण्यासाठी मी असला शॉर्टकट कधीच वापरला नाही असे मीरा सांगते. “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत मिराला छोटीशी भूमिका मिळाली होती. याखेरीज समीरा ही शॉर्टफिल्म देखील तिने अभिनित केली.

meera jagtap photo
meera jagtap photo

मात्र मोमोच्या भूमिकेमुळे मिराला अभिनयाचा जास्त वाव मिळाला. मीरा जगन्नाथ हिने साकारलेले मोमो हे तिचे पात्र प्रेक्षकांनाही आवडत असल्याची प्रतिक्रिया तिला नेहमीच मिळते. गेल्या चार वर्षांपासून मीरा आपल्या कुटुंबापासून दूर मुंबईत राहत आहे. त्यामुळे साहजिकच घरच्यांची आठवण तिला नेहमीच होते. मालिकेच्या सेटवर शुभांगी गोखलेना पाहिल्यावर त्या मला माझ्या आई सारख्याच वाटतात. फावल्या वेळात मन रामवे म्हणून घरातच असलेल्या गार्डनिंगमध्ये वेळ घालवणे, योगा करणे हे तिचे नित्याचेच आहे. याशिवाय एकट्याने भटकंती करणेही मिराला आवडते. यामुळे खर्च किती होतो हे समजते, निसर्गाला जवळून पाहता येते. मॉडेलिंग, योगा आणि अभिनय क्षेत्रात आपलं नाव कमावणाऱ्या ह्या नवख्या अभिनेत्रीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here