माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत काकूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री “मानसी मागिकर” ह्यांना आपण गोट्याची आई म्हणून आजही ओळखतो. त्यांना पाहिलं तरी अनेकांना गोठाची माई आठवते. त्यांच्यामुळे माझी तुझी रेशीमगाठ मालिका पाहायला खरा चढला, एक सोज्वळ आई किंवा शेजारील काकू त्यांनी उतृष्ठरित्या निभावताना पाहायला मिळतात. गोट्या मालिकेत देखील आईचे छत्र हरवलेल्या गोट्यावर प्रेम करणारी माई मानसी मागिकर यांनी त्यांच्या अभिनयाने चोख बजावली होती. मानसी मागिकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव “विनया तांबे” असे होते.

मालिकेत गोट्याची भूमिका साकारली होती “जॉय घाणेकर” या बालकलाकाराने. गोट्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला जॉय घाणेकर पुढे जाऊन मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला. जॉय घाणेकर हा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते “गिरीश घाणेकर” यांचा मुलगा आहे. त्यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला, हेच माझे माहेर, गोष्ट धमाल नाम्याची , राजाने वाजवला बाजा, बाळाचे बाप ब्रह्मचारी , नवसाचं पोर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. गिरीश घाणेकर आणि मीना घाणेकर यांना ध्रुव आणि जॉय ही दोन अपत्ये. जॉयने गोट्या मालिकेव्यतिरिक्त राजाने वाजवला बाजा हा चित्रपट साकारला होता. पुढे अभिनय क्षेत्र सोडुन त्याने आपल्या शिक्षणावर अधिक भर दिला आणि सध्या यूएसला Talech कंपनीत प्रॉडक्ट हेड म्हणून कार्यभार सांभाळताना तो दिसत आहे. जॉयचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे. अभिनयापासून तो आता दूर असला तरी त्याने केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आजही इंटर्नवर गोट्या मालिका आवडीने पाहिली जाते.