सुबोध भावे मराठी चित्रपट सृष्टी मालिका तसेच नाटकांतलं खूप मोठं नाव. अभिनय असो किंवा डायरेक्शन व निर्मिती पूर्ण जीव ओतून काम करताना ते नेहमीच पाहायला मिळतात. सेटवर ते नेहमी हसत खेळताना काम करतात आपल्या सोबतच्या नवोदित कलाकारांना ते नेहमीच प्रोत्साहन देतात. आज सोबोध भावे ह्यांच्या लग्नाचा २० वा वाढदिवस त्यानिमित्त सोबोधने आपल्या पत्नीला ( मंजिरी भावे) लग्नाचे काही फोटो टॅग करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. अगदी शालेय जीवनापासूनच दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. पुढे सुबोधने आयटी कंपनीत काम देखील केले पण म्हणतात ना ज्यात मजा येत नाही ते काम आपलं नाही.


तसेच काहीसं सुबोधच्या बाबतीती घडलं आणि नोकरी सोडून तो अभिनयाकडे वळला. जवळपास १५ वर्षांपासून सुबोध मराठीसृष्टीला दिसतोय. नाव कमवायला खूप दिवस लागतात ते काही खोटं नाही असं तो नेहमी म्हणतो. नुकतंच त्याने लग्नाचे फोटो शेअर करत पत्नीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या तो म्हणतो “लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. खूप काही न लिहिता “तू तिथे मी” इतकंच. “
