Home News “मिस दादर” २०२१ स्पर्धा जिंकणाऱ्या ह्या मुलीची आई आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

“मिस दादर” २०२१ स्पर्धा जिंकणाऱ्या ह्या मुलीची आई आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

4607
0
tiya talwalkar miss dadar 2021
tiya talwalkar miss dadar 2021

नुकतीच मिस दादर हि सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. खूप कमी लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला असला तरी ऑनलाईन मिळे हि स्पर्धा उत्कृष्ठरित्या पार पडली. ह्या स्पर्धेत “मिस दादर” २०२१ जिंकणाऱ्या मुलीचं नाव आहे ” टिया तळवलकर”. नावावरूनच अनेकांनी तिच्या आईला ओळखलं असेल, तिच्या आईच नाव आहे सुलेखा तळवलकर. सुलेखा ह्या मराठी अभिनेत्री असून अनेक मालिकांत त्या पाहायला मिळतात. सांग तू आहेस का या मालिकेत त्या सध्या अभिनय साकारत आहेत. झी मराठीच्या माझा होशील ना मालिकेतून त्यांनी काही काळ सईच्या आईची भूमिका साकारली होती.

sulekha talwalkar daughter tiya
sulekha talwalkar daughter tiya

रुईया कॉलेजमध्ये असताना नाट्यवलय या नाट्यसंस्थेशी त्या जोडल्या गेल्या होत्या इथूनच रंगभूमीशी त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. असंभव, कुंकू, असे हे कन्यादान, धुरळा, कदाचित, अग्निहोत्र, चार दिवस सासूचे, अवंतिका, ‘तेरी भी चूप मेरी भी चूप, श्रीमान श्रीमती अशा हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातून अभिनेत्री “सुलेखा तळवलकर” यांनी आपल्या सजग अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. विरोधी भूमिका असो वा नायिका, सह नायिकेच्या भूमिका त्या त्यांनी आपल्या अभिनयातून तितक्याच नेटाने सांभाळल्या. नाटक मालिकेतून काम करत असताना अंबर तळवलकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. दिवंगत अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांच्या त्या सून आहेत अंबर तळवलकर हा त्यांचाच मुलगा. सुलेखा आणि अंबर तळवलकर यांना आर्य आणि टिया ही दोन अपत्ये.

टियाने नुकत्याच एका सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला आहे आणि या पहिल्याच स्पर्धेत तिने प्रथम स्थानापर्यत मजल मारली आहे. नुकत्याच झालेल्या “मिस दादर” २०२१ स्पर्धेमध्ये टियाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ही सौंदर्य स्पर्धा तिने जिंकली असल्याने सुलेखा तळवलकर यांना खूप आनंद झाला आहे. आपल्या लेकीचे हे कौतुक पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय हा आनंद त्यांनी इन्स्टाग्रामवरून त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करून सांगितला आहे. टियाचे हे यश मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात येण्यास नक्कीच कामी येईल याबाबत शंका नाही या यशाबद्दल टियाचे मनापासून खूप खुप अभिनंदन!!!….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here