मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर नुकताच माऊचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माऊला सेटवर एक चँग सरप्राईज मिळाले आहे. माऊची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “दिव्या सुभाष पुगावकर” हिने. तिला दिव्या सुभाष याच नावाने फारसे ओळखले जाते . २१ जुलै रोजी दिव्याचा वाढदिवस असतो या वाढदिवसाचे औचित्य साधून तिच्या बॉयफ्रेंडने अचानकपणे सेटवर येऊन दिव्याला एक छान सरप्राईज दिले आहे. मालिकेमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून दिव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडची भेट घडून आली नव्हती.

मात्र मालिकेचे कलाकार योगेश सोहनी याच्या मदतीने तिच्या बॉयफ्रेंडने केक आणून दिव्याला सरप्राईज देण्याचे ठरवले. दिव्या त्या सजवलेल्या रूममध्ये येताच आपल्या बॉयफ्रेंडला घट्ट मिठी मारली. तिच्या या बॉयफ्रेंडचे नाव आहे अक्षय घरत. दिव्याचा बॉयफ्रेंड अक्षय घरत हा नवी मुंबईत वास्तव्यास आहे. तो एक फिटनेस ट्रेनर, मॉडेल आणि न्यूट्रिशनिस्टदेखील आहे. त्याच्या फिटनेसकडे पाहून अनेक तरुण त्याला फॉलो करताना दिसतात. दिव्या आणि अक्षय गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दिव्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्षयने मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर येऊन दिव्याची भेट घेतली. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. दिव्या सुभाषणे मुलगी झाली हो या मालिकेव्यतीरिक्त महेश कोठारे यांच्या विठुमाऊली मालिकेतूनही काम केले होते शिवाय काही सौंदर्य स्पर्धाही तिने जिंकल्या आहेत. मुलगी झाली हो मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेले माऊ म्हणजेच साजिरीचे पात्र हे बोलत नसले तरी तिच्या मूक अभिनयातून तिला काय म्हणायचे आहे ते तिने अभिनयातून सुरेख दर्शवले आहे त्याचमुळे हे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले आहे.