ह्या महिन्याची सुरवात होते ना होते तोच मराठी कलाकारांच्या लग्नाचा एका मागून एक सपाट लागलेला पाहायला मिळाला. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणा आणि अंजली म्हणजेच हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षय देवधर यांचं लग्न ह्या २ तारखेला पार पडलं. यांच्या लग्नाच्याच दिवशी माझा होशील ना या मालिकेतील अभिनेता आशय कुलकर्णी ह्याचा देखील विवाह झाला. अभिनेता आशय कुलकर्णी याने नृत्यांगना असलेल्या सानिया गोडबोले हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. ह्या दोन लग्नानधी ती परत आलीये मालिकेतील नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी ह्याएकाच मालिकेतील २ कलाकारांनी लग्न केलेलं पाहायला मिळालं. आता नुकतंच बाळु मामाच्या नावानं चांगभलं ह्या मालिकेतील अभिनेत्रीचा देखील विवाह सोहळा संपन्न झाला आहे.

कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं हि मालिका प्रेक्षकांच्या खूपच आवडीची मालिका आहे. याच मालिकेतील मालिकेतील अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार यांनी देखील केलं आहे. या दोघांचं लग्न देखील २ डिसेंबर २०२२ रोजीच झालं असल्याचं समजत. चंद्रपूर येथे शाही थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला. अभिनेत्री अमृता उत्तरवार हिने लग्नाचे काही फोटो शेअर करत लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अमृता हि मूळची विदर्भातली आहे. विदर्भाच्या मुलीने अभिनय क्षेत्रात येऊन आपलं नाव उंचावलं ह्याचा विदर्भातील लोकांना अभिमान आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून अमृताला अभिनयाची ओढ लागली होती. अमरावती युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यांनंतर तिने नोकरी केली. पण एखाद्या कलाकाराला आपल्या कलेत रस असतो नोकरीत नाही हे तिला समजून चुकले आणि तिने पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. मनोधैर्य या चित्रपटात तिने किशोरी शहाणे सोबत मुख्य नायिकेची भूमिका देखील साकारली होती. घेतला वसा टाकू नको, नकळत सारे घडले, श्री गुरुदेव दत्त, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, गाथा नवनाथांची अश्या एकामागून एक मालिका आणि चित्रपटाच्या संधी तिला मिळत गेल्या. अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार यांच्या लग्नाला अनेक कलाकार आवर्जून उपस्थित राहिले. आमच्या टीम कडून देखील अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
